शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बाप्पाच्या विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:37 IST

मार्गावर ८६ खड्डे

ठळक मुद्देबालाजीपेठ रस्ता ते रथचौकापर्यंत २२ खड्डेशिरसोली नाक्यानजीक रस्त्याची चाळणी

विजयकुमार सैतवाल

जळगाव : अवघ्या १२ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची मंडळांकडून जोरदार तयारी सुरू असली तरी बाप्पाच्या विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे ‘विघ्न’ कायम आहे. या मार्गाच्या सुरुवातीपासूनच खड्यांना सुरुवात होऊन निरोपाच्या अखेरच्या टोकावरदेखील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.या मार्गावर जागोजागी तब्बल ८६ खड्डे असल्याचे आढळून आले.१३ सप्टेंबर रोजी बाप्पांचे आगमन होत असून त्यासाठी शहरात मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे. असे असले तरी मनपा प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष कायम असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे काम करण्यात आले असून तेवढा दिलासा आहे, मात्र उर्वरित खड्डे एवढ्या कमी दिवसात बुजविण्याचे आव्हान मनपा समोर आहे.रस्त्यांच्या या दुरवस्थेसंदर्भात शुक्रवारी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली असता या मार्गाच्या सुरुवातीपासून अखेरच्या टोकापर्यंत ८६ खड्डे आढळून आले.बालाजीपेठ रस्ता ते रथचौकापर्यंत २२ खड्डेबालाजीपेठ परिसरातून रथ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच खड्डा आहे. त्यावर दगडदेखील ठेवलेला असल्याचे दिसून आहे. या ठिकाणापासून ते रथ चौकापर्यंत तब्बल २२ खड्डे आढळून आले. विशेष म्हणजे अरुंद असलेल्या या रस्त्यावर अगोदरच वाहनांची मोठी वर्दळ असते व त्यात खड्यांच्या डोकेदुखीने नेहमीच वाहनधारकांना मनस्ताप होतो. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरी या रस्त्याचे भाग्य उजळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पुढे सराफ गल्लीच्या सुरुवातीपासून ते सुभाष चौकात रस्ता चांगला असला तरी आठवडे बाजार चौकापर्यंत तीन खड्डे असल्याचे आढळून आले.लहान मोठे अडथळे कायमबी.जे. मार्केट समोर रस्त्यांचे काम केले असले तरी तेथून पुढे पांडे डेअरी चौकापर्यंत काही ठिकाणी लहान मोठे अडथळे आहे. या सोबतच पांडे डेअरी चौकात आजूबाजूला असलेले खड्डे त्रासदायक ठरणारे आहेत.पांडे डेअरी चौक ते सिंधी कॉलनी दरम्यान झाली डागडुजीपांडे डेअरी चौकापासून पंचमुखी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनीचा रस्ता असे थेट इच्छादेवी चौकापर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले आहे.शिरसोली नाक्यानजीक रस्त्याची चाळणीइच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यापर्यंतकॉंक्रीटचा चांगला रस्ता असला तरी या दरम्यान तीन खड्डे आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी ते धोकादायक ठरू पाहतात. शिरसोली नाक्याच्या अलीकडे तर रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे.त्यामुळे येथे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.गायत्रीनगर ते नेहरू नगर दरम्यान मोठे ७ खड्डेशिरसोली नाक्यापासून पुढे रस्त्याची चांगली अवस्था असून येथून भरधाव वेगाने वाहने जातात. मात्र गायत्रीनगर ते नेहरू नगर दरम्यान मोठे सात खड्डे आहेत. साधारण चार ते पाच इंच खोलीचे हे खड्डे नेहमी वाहनांसाठी धोकेदायक तर आहेच सोबतच विसर्जन दरम्यान गर्दीत ते न दिसल्यास गणेशभक्तांसाठी त्रासदायक ठरू शकतात, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.सेंट टेरेसा शाळा ते तलावापर्यंतच्या रस्त्याची चाळणीशिरसोली रस्त्यावरून सेंट टेरेसा शाळेकडून मेहरुण तलावाकडे खाली उतरतानाच सुरुवातीपासून रस्त्याची चाळणी झालेली आहे. उतार असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनांचा तोलही जातो. पुढे थेट मेहरुण तलावापर्यंत हा रस्ता पूर्णपणे खराब आहे. त्यात मध्येच खोलगट भाग असल्याने तेथे पाणीही साचलेले आहे.सेंट टेरेसा ते श्रीकृष्ण लॉन दरम्यान ३१ खड्डेकाही गणेश भक्त सेंट टेरेसा शाळेकडे वळणाºया रस्त्याच्याही पुढे जाऊन शिरसोली रस्त्यावरून मेहरुण तलावाकडे विसर्जनासाठी जातात. सेंट टेरेसा शाळा ते श्रीकृष्ण लॉन दरम्यान ३१ खड्डे असून वाहनधारकांना त्यातून मार्ग काढत जावे लागते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव