शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 01:28 IST

व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.

ठळक मुद्देअनुयायांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या : परिसरात तणावसंशयिताच्या घराची तोडफोड

भुसावळ, जि.जळगाव : व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तिलक छोटू मट्टू (रा. द्वारका नगर) याने मध्य प्रदेशमधील रायपूर येथे आरबीआयच्या परीक्षेसाठी गेलेल्या आदर्श सोनवणे मित्रास फोन केला. यावेळी त्यांच्यात फोनवर चांगलाच वाद झाला. त्यात तिलक मट्टू याने महापुरुषाचे नाव घेऊन शिवीगाळ केली, ती आॅडीओ क्लिप सोनवणे यांनी मित्रांच्या व्हॉट्अप ग्रुपवर टाकली. ती क्लीप वायरल झाली. यामुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. यानंंतर जमावाने संशयित आरोपीच्या घरात तोडफोड केली व संशयितावर गुन्हा दाखल करुन कारवाईच्या मागणीसाठी शहर पोलीस ठाणे गाठत महिला पुरुषांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.यावेळी पोलिसांतर्फे जमावाला शांततेचे आवाहन करण्यात आले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देविदास पवार, तालुका पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलीस अधिकारी शहर पो.स्टे.ला दाखल होऊन शहरात पोलीस कर्मचारी तैनात केले. यावेळी जमावाने पोलिसांना लेखी निवेदन देऊन अपशब्द वापरणारी पोस्ट टाकल्याबद्दल संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी केली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी रात्री उशिरा सामूहिक फिर्यादीवरुन संशयित आरोपी तिलक मट्टू याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ