शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मंगळदेवग्रह मंदिराची टपाल खात्याकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:56 IST

मंगळवारी पाकिटाचे होणार अनावरण

अमळनेर : श्री मंगळदेव ग्रह मंदिराची टपाल खात्याने दखल घेतली असून, २६ मार्च रोजी मंदिराचे छायाचित्र असलेल्या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता या मंदिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे ज्वाज्वल्य, तेथील स्वच्छता, भाविकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, पारदर्शकता, सामाजिक जाणिवेचे भान यामुळे या मंदिराची ख्याती देशातील कानाकोपऱ्याच नव्हे तर परदेशातही पोहोचली आहे. राज्यातील बोटावर मोजण्याइतकीच मंदिरे ‘आयएसओ’ मानांकित आहेत. त्या श्रेय नामावलीत या मंदिराचा समावेश आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेवर या देवस्थानाचा सुपरिणाम आता दृश्य स्वरूपात स्पष्टपणे दिसू लागला आहे. या सर्व बाबींचा परिपाक म्हणून टपाल खात्याने या मंदिराची दखल घेत श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे छायाचित्र असलेले पाकीट अनावरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवार, २६ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद विभागाचे पोस्टमास्तर जनरल व्ही. एस. जयशंकर यांच्याहस्ते मंदिरातच पाकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले हेदेखील उपस्थित राहणार आहेत. टपाल खात्याच्या पाकिटावर छायाचित्र असण्याचा प्रथम मान श्री मंगळदेव ग्रह मंदिराला मिळाल्याचा दावा संस्थानच्यावतीने करण्यात आला आहे.