शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात कृषि उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:31 IST

पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी पिकांची वाढ खुंटलीजिल्ह्यातील हलक्या जमिनीवरील पिके धोक्यातजळगाव जिल्ह्यातील काही भागात अधिक बिकट स्थिती

जळगाव : पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड वाढत गेल्यास उत्पादनातील घटीचे प्रमाण वाढण्याची भिती आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरूवात केली होती. त्यानंतरही काही प्रमाणात पाऊस झाल्याने राहिलेल्या पेरण्याही पूर्ण झाल्या. मध्यंतरी ५-६ दिवस खंड पडल्याने त्या काळात शेतकºयांनी पिकांना खताचा डोसही दिला. त्यानंतर लगेचच पावसाने हजेरी लावल्याने खतही चांगले लागू पडले. मात्र त्यानंतर पिक ऐन वाढीच्या स्थितीत आलेले असताना गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे.बहुतांश पिकांची वाढ खुंटलीपावसाने पिकांच्या ऐनवाढीच्या काळातच दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने काही शेतकºयांनी खते देणेही टाळले आहे. पिकांची वाढ खुंटली असून सोयाबिन वगळता सर्वच पिकांच्या उत्पादनात आजच्या स्थितीला किमान २० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. उडीद-मुगाचे पीक तर जेमतेम ६५-७५ दिवसांचे असते. त्याला आतापर्यंत शेंगा लागणे अपेक्षित होते. मात्र वाढ खुंटल्याने अद्याप शेंगा लागलेल्या नाहीत. वाढ खुंटल्याने सर्वच पिकांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.कपाशी मोडणे सुरूकाही ठिकाणी तर कपाशीची वाढच चांगली झालेली नाही. असे शेतकरी कपाशी मोडून टाकत असून रब्बीसाठी शेत तयार करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. जामनेर, बोदवड, पाचोरा, मुक्ताईनगरचा वरचा भाग आदी भागात आधीच पावसाने तुरळक हजेरी लावलेली असतानाच पंधरा दिवस ताण दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही हलक्या जमिनीवरील पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीJalgaonजळगाव