जळगाव : शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी शहरातील सहा ठिकाणी डल्ला मारणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे़ त्याच्याजवळून पोलिसांनी चोरीला गेलेला एलईडी टीव्ही हस्तगत केला आहे़पाच ते सहा महिन्यांपूर्वी समर्थ कॉलनी परिसरातील विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी अरूण महाजन यांच्या घरात चोरट्याने किरकोळ रक्कम व एलईडी टीव्ही चोरून नेला होता़ याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता़ दरम्यान, पाटील यांच्या घरात डल्ला मारणारा चोरटा हा तांबापुरातील रहिवासी असून तो अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्यात अल्ताफ पठाण यांना मिळाली़शुक्रवारी लागलीच पठाण यांच्यासह रवी पाटील, रूपेश ठाकरे, रवी नरवाडे यांनी त्वरित तांबापुरा गाठत तेथून अल्पवयीन मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले़
सहा ठिकाणी चोरी करणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:41 IST