साकेगावातही गोरगरिबांना मिळणार धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 03:26 PM2020-05-22T15:26:26+5:302020-05-22T15:27:35+5:30

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर साकेगाव ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे याबाबत मेल करण्यात आला होता. प्रशासकीय स्तरावर ग्रामपंचायत साकेगावच्या मेलची दखल घेण्यात आली आहे.

The poor will also get food grains in Sakegaon | साकेगावातही गोरगरिबांना मिळणार धान्य

साकेगावातही गोरगरिबांना मिळणार धान्य

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या मेलची घेतली दखलविना शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार धान्य

भुसावळ : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर साकेगाव ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे याबाबत मेल करण्यात आला होता. प्रशासकीय स्तरावर ग्रामपंचायत साकेगावच्या मेलची दखल घेण्यात आली असून, महसूल प्रशासनातर्फे गोरगरिबांसाठी प्रतिव्यक्ती, प्रतिमहा पाच किलो तांदूळ मागासवर्गीय, विना शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू पुकारण्यात आले होते. यादरम्यान अनेक गोरगरीब व हातावर पोट भरणारे मजुरांची बिकट अवस्था झाली होती. साकेगाव परिसरातही अनेक आर्थिक दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबत सरपंच अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व केंद्र शासनाला ई-मेलद्वारे गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे याबाबत १३ एप्रिल रोजी ई-मेल करण्यात आले होते. महिनाभरानंतर दखल घेत आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा तसेच कोणत्याही राज्य योजनेतील समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांना मोफत धान्य वाटप होणार आहे.
साकेगावचे तलाठी हेमंत महाजन यांनी नागरिकांना संपर्क साधून गरजू कुटुंबांना लाभ मिळावा याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.
 

Web Title: The poor will also get food grains in Sakegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.