शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा येथून आठवीचा विद्यार्थी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:36 IST

चिंचपुरे येथील रहिवासी व पाचोरा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणारा अन्वर उखर्डू तडवी (वय १४ वर्षे) हा आदिवासी विद्यार्थी दि.४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे.

ठळक मुद्देतर्कवितर्क चर्चेला उधाणपालक चिंताग्रस्त

पाचोरा : तालुक्यातील चिंचपुरे येथील रहिवासी व पाचोरा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणारा अन्वर उखर्डू तडवी (वय १४ वर्षे) हा आदिवासी विद्यार्थी दि.४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे.याबाबत मुलाचे वडील उखर्डू अब्दुल तडवी रा.चिंचपुरे, ता.पाचोरा यांनी सांगितले की, अन्वर उखर्डू तडवी हा पाचोरा येथील त्र्यंबक नगरातील एका वसतिगृहात राहून तुळजाई शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात आठवीत शिक्षण घेतो.१ फेब्रुवारी रोजी अन्वर हा चिंचपुरे येथे सुट्टी असल्याने घरी आलेला होता. ४ रोजी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे त्यास भोजे गावाहून पाचोरा येथे जाण्यासाठी बसमध्ये बसवून दिले.मुलगा अन्वर नेहमीप्रमाणे पाचोरा येथे वसतिगृहात गेला असल्याचे समजून अन्वरचे वडील उखर्डू तडवी हे ११ रोजी पाचोरा येथे मुलास वसतिगृहात भेटण्यासाठी गेले. तेव्हा वसतिगृह अधीक्षक अनिल सावंत यांनी सांगितले की, ‘अन्वर ८ दिवस झाले. घरी गेल्यापासून परत आलाच नाही.’ तेव्हा अन्वरचे वडील भांबावून गेले. त्यांनी तत्काळ सर्व नातेवाईकांशी संपर्क केला असता अन्वर कुठेही आढळत नसल्याचे लक्षात आले.या घटनेची खबर देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे गाठले. तेव्हा ही घटना पाचोरा येथे घडल्याने पाचोरा पोलीस स्टेशनला नोंदवा, असे मुलाच्या वडिलास पोलिसांनी संगितले.भांबावलेले पालक उखडू तडवी पाचोरा पोलीस ठाण्यात आले. मुलगा भोजे गावाहून बसमध्ये बसल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने तेथेच दाखल करावे म्हणून पाचोरा पोलिसांनी त्यास हुसकावून दिले. दरम्यान, मुलगा आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पालकांना आज कळाले. विद्यार्थी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.४ रोजी सोमवती अमावस्य होती, त्या मुलाचे अपहरण तर झाले नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचदिवशी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील विद्यार्थ्याचा निर्घृण खून झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मुलाची उंची ३.५ फूट असून, रंग गहुवर्णी, सडपातळ बांधा आहे.

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाPachoraपाचोरा