शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाचा खरीप तुर्तास तरी वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:20 IST

उत्पादन मात्र घटणार : पाऊस आल्याने मिळाला थोडासा दिलासा

ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्रातील कपाशी व तूर पिकाला फटकाशेतकºयाच्या गुणंतवणुकीचा लागलाय सट्टाअजूनही उत्पादनाची हमी नाही

राम जाधवऑनलाईन लोकमत,जळगाव, दि़ 28 - संपूर्ण राज्यातून जुलै महिन्याच्या शेवटी काढता पाय घेतलेल्या पावसाने २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केल्याने बळीराजाचा हातचा जाणारा खरीप हंगाम वाचला आहे़ मशागतीपासून बी-बियाणे, औषधी, खते आदी खर्च करून या राजाने आपली सर्व गुंतवणूक शेतात केलेली होती़ त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो, की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती़ परंतु निसर्गाच्या कृपेने पुन्हा पाऊस काही ठिकाणी पडत आहे़ मात्र अजूनही या बळीराजाच्या घरात संपूर्ण उत्पन्न येईल की नाही, अशी परिस्थिती आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या गुणंतवणुकीचा हा सट्टाच लागला आहे़मात्र या पुनरागमनामध्ये पाहिजे तसा दम सर्वत्र नव्हता़ त्यामुळे मोजका काही भाग सोडला तर फारसा पाऊस राज्यात झालेला नाही़ खान्देशातील विचार करता १९ ते २१ आॅगस्ट दरम्यान झालेला पाऊस नंदुरबार जिल्ह्यातील बहुतेक भागात पोहचलाच नाही़ तसेच सोमवारपासून ओसरलेल्या पावसाने मंगळवारीही ओढ कायम ठेवल्याने पुन्हा एकदा शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत़सध्या पावसाचे वातावरण जरी असले, तरी अजूनही खान्देशातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ तर कोरडवाहू शेतकºयांचा अद्यापही जीव टांगणीला लागलेला आहे़ ज्या भागात चांगला पाऊस झालेला आहे़ तेथील पीक परिस्थिती तूर्तास तरी चांगली दिसत आहे़ मात्र गेल्या पंधरा दिवसांच्या खंडामुळे कपाशी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात नक्कीच घट येणार आहे़ आता आलेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे़खतांची वेळ हुकलीमका हे खादाड पीक असल्याने या पिकाला खतांची मात्रा पुरेशा प्रमाणात असावी, परंतु पाऊस पडत नसल्याने शेतकºयांनी मका पिकासह सर्वच पिकांना खतांचा डोस देण्याचे टाळले़ तर काहींनी पाऊस पडल्यावर गेल्या चार दिवसात कपाशी व मक्याला खते टाकण्याचे काम केले़ परंतु यातील नत्र वगळता स्फुरद व पालाश ही खते २८ दिवसांनंतर पिकांना उपलब्ध होतील़ त्यामुळे खतांचा डोस हुकल्यानेही मका पिकाच्या उत्पादनात साहजिकच घट येईल हे स्पष्ट आहे़कडधान्यांना फटकाचउडीद व मूग या कडधान्यांना मात्र याचा फटका बसला आहे़ गेल्या पंधरवड्यात ऐन शेंगा भरण्याचा काळ असताना व शेवटच्या टप्प्यात पीक असताना पावसाने उघडीप दिली़ यामुळे कडधान्याची पिके कोमेजल्याने उत्पादनात किमान २५ ते ३० टक्के घट तेव्हाच आली़ त्यातही काढणीला आलेल्या उडीद व मुगाच्या शेंगा पावसात भिजल्याने काही प्रमाणात वाया गेल्या़ यामुळे हातचे आलेलेही निसर्गाने हिरावल्याची परिस्थिती बहुतेक शेतकºयांवर ओढवली़मक्याच्या उत्पादनात येणार घटपावसाच्या खंडामुळे धुळे, जामनेर, बोदवड, धरणगाव इत्यादी भागातील मक्याचे पीक मोठ्या प्रमाणावर सुकले होते़ त्यामुळे या पिकाची वाढ अपूर्ण झालेली आहे़ तर इतरही भागातील मका पिकाला पाण्याची ताडम बसल्याने उत्पादनात घट येणारच आहे़ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या बागायती कपाशीच्या किमान २५-३० पेक्षा जास्त कैºया तयार झाल्या आहेत़ त्यामुळे या पावसाचा या कपाशीला फायदा झालेला आहे़ मात्र कोरडवाहू क्षेत्रातील कपाशी व तूर पिकाला गेल्या आठवड्यात तडाखा बसला होता़ त्यांना आता या पावसाने जरी जीवनदान मिळाले असले, तरी मागील पावसाच्या खंडाचा विपरित परिणाम उत्पादनावर होणार आहे़ अजूनही या पिकाला पाण्याची गरज आहे़जिल्ह्यासह खान्देशात सर्वत्र पिकांची परिस्थिती बिकट झाली होती़ मात्र शेवटी पाऊस आल्याने बळीराजा तारला गेला आहे़ सद्या कपाशी व मकाचे पीक चांगले आहे़ मात्र अजून पावसाची गरज आहे़- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव़