शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बँकेचे कर्ज न फेडल्याने पाचोरा कृउबाला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:59 IST

पाचोरा : पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामासाठी जळगाव पीपल्स बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड १० वर्षे होऊनही न झाल्याने ...

पाचोरा : पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामासाठी जळगाव पीपल्स बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड १० वर्षे होऊनही न झाल्याने ७ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या सात खोल्या बँकेने सील केल्या. मात्र नंतर चार खोल्यांचे सील काढल्याने सभापतींच्या दालनासह इतर खोल्यांचे सील कायम आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने २००८मध्ये साडेचार कोटीचे कर्ज घेऊन बांधकामे केली. मात्र बाजार समितीने कर्जफेड न केल्याने बाजार समितीकडे बँकेचे ५ कोटी ४ लाख थकबाकी आहे. त्यामुळे गुुरुवार ७ फेब्रुवारी रोजी जळगाव पीपल्स बँकेने तारण घेतलेली मालमत्ता जप्त करून सील केली.स्थगिती असताना कारवाईदरम्यान कर्जापोटी बाजार समितीच्या जागेचा लिलाव बँकेने करण्याचे ठरविले, मात्र त्यास सहकार आयुक्त नाशिक यांच्याकडे हरकती दाखल केल्या. त्यामुळे जागा विक्रीस स्थगिती दिली आहे. जागा विक्रीस स्थगिती असताना बँकेने बाजार समितीस मालमत्ता जप्तीची नोटीस न देता गुुरुवारी अचानक बँकेच्या ८ वसुली अधिकाऱ्यांनी बाजार समितीचे कामकाज सुरू असताना बाजार समितीच्या कार्यालयातील ७ खोल्यांना सील ठोकले. मुख्य प्रवेश द्वारासदेखील कुलूप लावले. मात्र पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी घटनास्थळी धाव घेत भविष्यातील कायदा व सुव्यवस्था, शेतकºयांचा प्रश्न याविषयी संबंंधितांना समज देत मध्यस्थी केली. त्यामुळे बाजार समितीच्या कामकाजासाठी ४ खोल्यांचे सील काढून पुन्हा सचिवांच्या ताब्यात देण्यात आले. सभापती व सचिवांचे कॅबिन, सभागृह या तीन खोल्या सील करण्यात आल्या आहेत.या वेळी बँकेच्या अधिकाºयांनी कृउबाचे सचिव बी. बी. बोरूडे यांच्याशी अरेरावी करीत कर्मचाºयांना बाहेर काढले, असा आरोप करण्यात आला.प्रथमच नामुष्की४ तास कारवाई होत असतानाही जबाबदार पदाधिकारी तेथे चर्चेला का आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बँकेची ही कारवाई नाटक तर नाही ना ? अशी शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्यात चर्चा सुरू होती. शेतकºयांची संस्था कर्जाच्या खाईत लोटल्याने कर्ज घेणाºया तत्कालीन संस्था चालकांच्या गैरव्यवहाराची उपस्थितांत चर्चा सुरू होती. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच ही नामुष्की ओढवल्याने दहा वर्षातील संस्थाचालकांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.बँकेने बेकायदेशीर जप्ती करून नियमांचे उल्लंघन केले आहे. बँकेने यापूर्वीच बाजार समितीचा भूखंड विक्रीस काढला असताना इतर मालमत्तेवर कब्जा घेण्याचे कारण नाही. मागील सत्ताधाºयांनी ८ कोटीच्या कर्जासाठी ८० कोटीची मालमत्ता तारण देणें हेच चुकीचे झाले.- सतीश शिंदे, सभापती पाचोरा कृउबाबँकेची अशाप्रकारे कारवाई करणे बेकायदेशीर असून सदरील बाब न्यायप्रविष्ट असल्याने बँकेने न्यायालयाचा अवमान केला आहे. याविषयी शेतकºयांसह बँकेविरुद्ध कोर्टात जावे लागेल.- अ‍ॅड. विश्वासराव भोसले, उपसभापती बाजार समितीबाजार समितीकडे वारंवार कर्जफेड बाबत मागणी करूनही परतफेड करीत नसल्याने नियमाप्रमाणे कारवाई करणे भाग पडल. शेतकरी हितासाठी व कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चर्चेअंती काही खोल्यांचे सील तोडून सचिवांकडे कामकाजासाठी ताब्यात दिले. बँक पूर्ण पैसा वसूल करेल.- राजेंद्र सोनार बँक अधिकारी, जळगाव पीपल्स बँकबँकेने जप्तीबाबत कोणतीही सूचना न देता केलेली कारवाई चुकीची असून बँकेच्या अधिकाºयांनी अरेरावी करीत आमच्या दैनंदिन कामात व्यत्यय आणला.- बी. बी. बोरूडे, सचिव, बाजार समिती

 

टॅग्स :Jalgaonजळगाव