शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे निदर्शने , जलसंपदा मंत्र्यांना अडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 13:00 IST

काळ्या फिती लावून केला निषेध

अमळनेर : पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे महायुतीच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काळ््या फिती गळ्यात घातलेल्या आंदोलनकर्त्यांनी ह्यपाडळसरे धरण झालेच पाहिजेह्ण चे घोषणा फलक दाखवून निदर्शने केली. या धरणासाठी ५० वर्षे वाट पाहिली आता आणखी थोडे दिवस वाट पाहा, निश्चिन्त राहा असे सांगून गिरीश महाजन यांनी वेळ मारून नेली. त्यानंतर मात्र सभेत ही निवडणूक कोणत्या धरणाची नाही किंवा रस्त्याची नाही असे सांगितले.पाडळसरे धरण शीघ्र गतीने पूर्ण व्हावे म्हणून पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे दीर्घकाळ आंदोलन करण्यात आले. जलसंपदामंत्री महाजन यांनी महामोर्चास निधी देण्याचे दिलेले आश्वासन न पाळल्याने जनआंदोलन समितीतर्फे मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांना पाडळसरे धरणास दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी चोपडा नाका येथे टोप्या घालत हातात घोषणा फलक घेऊन व गळ््यात काळ््या पट्या घालून मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने निदर्शन केली. याप्रसंगी महाजन यांनी वाहनातून उतरत बोला, आपल काय म्हणणे आहे, मी रस्त्यावरचा माणूस आहे इथंही बोलू या, असे सांगितले. तर आंदोलनकर्ते माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांनी पाडळसरे धरण हा मोठा प्रश्न असून रस्त्यावर चर्चा करता येणार नाही असे सांगितले. त्यावर महाजन यांनी धरण हा माझ्याच जिल्ह्यातील विषय आहे. मला या प्रश्नांची जाणीव आहे, निवडणुकीनंतर प्राधान्याने या कडे लक्ष देतो, असे सांगितले. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जनआंदोलन समितीचे पदाधिकारी एस.एम. पाटील, रणजित शिंदे, अजयसिंग पाटील, वसुंधरा लांडगे, प्रतिभा पाटील, प्रा.अशोक पवार, महेश पाटील, सुनील पाटील, योगेश पाटिल, देविदास देसले, रवींद्र पाटील, प्रशांत भदाणे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव