शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घर परिसरातील केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:41 IST

लोकसभा निवडणूक

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी प्रचारादरम्यान अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत होते. त्यानुसार झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता आमदार, नगरसेवक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या परिसरातील मतदान केंद्रांची आकडेवारीही कमी दिसून येते. दरम्यान जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी मोठी जनजागृती झाली, मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे शहरी आकडेवरून दिसून येते. या मुद्याबाबत अधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.शहरातील ३३ केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान झाले असून या ३३ केंद्रांपैकी चार मतदान केंद्र आमदार सुरेश भोळे यांच्या निवासस्थान परिसरातील आहेत. यात रिंग रोडवरील स्टेट बँकेजवळील मतदान केंद्र क्रमांक २०२ (२६ टक्के), ख्वाजा मिया चौकाजवळील मॉडर्न गर्ल्स स्कूल मतदान केंद्र क्रमांक २०० (२९.७० टक्के), ख्वाजामिया चौक मतदान केंद्र क्रमांक १८९ (३५.४५ टक्के) व मतदान केंद्र क्रमांक १९० (३८.२६ टक्के) यांचा समावेश आहे.या शिवाय नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या परिसरातील भिलपुरा चौक मतदान केंद्र क्रमांक ११२ (३८.५७ टक्के), माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे निवासस्थान असलेल्या शिवराम नगरातील मतदान केंद्र क्रमांक २८९ (३५.१७ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २८६ ए (३७.५७ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २९२ (३९.३७ टक्के), भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांच्या परिसरातील आर.आर. विद्यालय मतदान केंद्र क्रमांक २०४ ( ३०.७२ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २०५ (३४.१२ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २०७ (३४.३८ टक्के), नगरसेवक उज्ज्वला बेंडाळे, नितीन बरडे, बंटी जोशी यांच्या परिसरातील मू.जे. महाविद्यालय मतदान केंद्र क्रमांक २३३ (३१.०४ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २३४ (३९.६५ टक्के) या पदाधिकाऱ्यांच्या परिसरात ४० टक्केच्या आत मतदान झाले आहे.भाजपा गटनेत्याच्या परिसरात अधिक मतदानमनपातील भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांच्या परिसरातील कंवरनगर कंवरनगर मतदान केंद्र क्रमांक २७६ (७०.९८ टक्के)मध्ये सर्वाधिक मतदान झाले. या सोबतच सिंधी कॉलनी मतदान केंद्र क्रमांक २७९ (६३.६४ टक्के), कंवरनगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २७५ (६१.६५ टक्के), नगरसेवक आबा कापसे यांच्या परिसरातील दांडेकर नगर पिंप्राळा मतदान केंद्र क्रमांक १४० (६०.२२ टक्के) या परिसरात ६० टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे.या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचे निवासस्थान परिसरात असलेल्या पाच पैकी चार मतदान केंद्रांवर ५० टक्केच्या आत मतदान झाले. भाजपाचे नगरसेवक चंद्रशेखर चौधरी यांच्या परिसरातील खोटे नगरातील पाचही मतदान केंद्रावर ५० टक्केच्या मतदान झाले.शिवाजीनगरात अधिक मतदानमाजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजीनगरातील २६ पैकी १३ मतदान केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक तर उर्वरित ११ मतदान केंद्रांवर ४० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव