शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कळमसरे-शहापूर रस्ता न झाल्यास मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:15 IST

ब्रिटीशकालिन कळमसरे-शहापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांना चार किलोमिटर अंतरावरील वासरे मार्गे शहापूर या समांतर वळण मार्गाचा वापर करावा लागत आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळे रस्ता वर्षानुवर्षे पडूनचार किलोमीटरचा रस्ता बनला मृृत्यूचा सापळाजेमतेम पाच फुट रस्ता आहे शिल्लक

कळमसरे, ता.अमळनेर : ब्रिटीशकालिन कळमसरे-शहापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांना चार किलोमिटर अंतरावरील वासरे मार्गे शहापूर या समांतर वळण मार्गाचा वापर करावा लागत आहे. या रस्त्यासाठी वारंवार निवेदन, मोर्चा व उपोषण केल्यानंतरही प्रशासनाकडून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येत नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.कळमसरे - शहापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पूर्वीचा १२ फुटाचा हा रस्ता जेमतेम ५ फुट शिल्लक राहिला आहे. आजूबाजूला निसटत्या, खोल खाच खडग्यात गेलेला, काटेरी झुडूपांनी व्यापलेल्या या पाच कि.मि.रस्त्यावर जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते. एस.टी.महामंडळाची बस पलटी होइल या भीतीने प्रवासी आसनाला घट्ट धरून असतात. जि.प.बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावर प्रत्येक निवडणूकीच्या तोंडावर खडीचे ढीग पडतात. खडीचे मातीत रूपांतर होईपर्यत कामाला सुरूवात होत नाही. सलग पाच कि.मि.चा हा रस्ता एकाच वेळी पुर्ण करत नाहीत. कधी कळमसरे गावाकडून तर कधी शहापूर गावाकडून फक्त १ ते दीड किलोमिटर काम करण्यात येत असते. तो पर्यत तयार झालेला रस्ता खड्डेमय होत असल्याची खंत शहापूरचे माजी सरपंच मुरलीधर पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकJalgaonजळगाव