धुळे : माजी नगराध्यक्ष हेमा गोटे यांच्या मिळकतीवर आणि आमदार अनिल गोटे यांनी नदीपात्रालगत पूररेषेत केलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात राष्ट्रवादी शुक्रवारी एकवटली़ अतिक्रमण काढून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांना निवेदन सादर करण्यात आल़े महापालिका हद्दीतील पेठ गल्ली नंबर 4 मधील सि़स़नं़ 486/1321 या सद्य:स्थितीत आमदारांचे निवासस्थान असून नवीन बांधकाम करण्यात आलेले आह़े सदर घर हे विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांच्या नावावर आह़े नवीन बांधकामाबाबत महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले आह़े सदर घराचे 1980-81 सालापासून जुन्या स्वरूपाचे बांधकाम होत़े परंतु सद्य:स्थितीत नवीन बांधकाम झाल्याचे आढळून येत आह़े नवीन बांधकाम करताना महापालिकेची अथवा तत्कालिन नगरपालिकेची कोणत्याही स्वरूपाची परवानगी अथवा मंजुरी घेतलेली नाही़ या घराचे बांधकाम लाकडी अथवा मातीचे तोडून सिमेंट काँक्रीटचे पूर्ण नवीन बांधकाम कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतरित्या केलेले आह़े तसेच आमदार अनिल गोटे यांनी पांझरा नदी पात्रालगत पूररेषेत महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतरित्या चौपाटीचे स्टॉल व संरक्षण भिंतीचे बांधकाम केलेले असून त्याबाबत सातत्याने तक्रारी झाल्या आहेत़ अनधिकृत बांधकाम तातडीने काढण्यात यावे व योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी कदमबांडे यांनी आयुक्तांकडे केली़
राजकीय पत्रक युद्ध!
By admin | Updated: October 17, 2015 00:15 IST