जळगाव : निवडणुकीच्या राजकीय गप्पांमधून उद्भवलेल्या वादातून रिक्षाचालक गोकूळ पाटील याने दिनेश काशिनाथ पाटील (२४)रा. हरिविठ्ठलनगर यांना चाकूने पोटात भोसकून जखमी केले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाद मिटल्यानंतर सर्व घरी परतले. त्यानंतर अध्र्या तासाने दिनेश भोई हे हरिविठ्ठलनगरातील मारोती मंदिराच्या ओट्यावर बसलेले होते. त्या वेळी गोकूळ पाटील हा रवींद्र महाजन याच्यासोबत तेथे आला. त्यांच्यात पुन्हा वादावादीला सुरुवात झाली. त्यातून गोकूळ पाटील याने त्याच्याजवळील चाकूने दिनेश भोई याच्या पोटात भोसकले. या झटापटीत दिनेशच्या डाव्या हाताच्या बोटांना आणि कोपराला चाकू लागला आहे. गर्दी झाल्यानंतर गोकूळ आणि रवींद्रने पळ काढला. मित्रांनी जखमी दिनेशला दुपारी ३.३0 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
-------------
रविवारी ऑटो रिक्षाचालकांचा संप असल्याने दिनेश भोई, गोकूळ महाजन आणि रवींद्र महाजन हे तीन रिक्षाचालक पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यात राजकारणाच्या गप्पांचा फड रंगला. मात्र गप्पांना पुढे वादाची फोडणी मिळाली आणि त्यांच्यात दे दणादणला सुरुवात झाली.