शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आत्महत्या केलेल्या पोलिसाच्या पत्नीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 20:06 IST

पोलीस कर्मचारी रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३, रा.शिव कॉलनी, जळगाव) याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी क्रांती उर्फ पूनम पाटील हिला रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आधी अटक केलेला पोलीस कर्मचारी सागर रमजान तडवी व क्रांती या दोघांना तपासाधिकारी बी.जी.रोहोम यांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्या.सोनी यांनी क्रांती हिला ३० आॅगस्ट तर सागर याला १ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देपोलीस व मयताच्या पत्नीला पोलीस कोठडीपत्नी क्रांती व पोलीस कर्मचारी रुपेश यांचे मोबाईल सीडीआर तपासणार

जळगाव : पोलीस कर्मचारी रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३, रा.शिव कॉलनी, जळगाव) याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी क्रांती उर्फ पूनम पाटील हिला रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आधी अटक केलेला पोलीस कर्मचारी सागर रमजान तडवी व क्रांती या दोघांना तपासाधिकारी बी.जी.रोहोम यांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्या.सोनी यांनी क्रांती हिला ३० आॅगस्ट तर सागर याला १ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पत्नीचे सागर तडवी या पोलीस कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंधाच्या संशयावरुन रुपेश पाटील या पोलीस कर्मचाºयाने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री शिव कॉलनीत घडली होती.याप्रकरणी याप्रकरणी सागर रमजान तडवी, पत्नी क्रांती उर्फ पूनम, सासू वर्षा यशवंत पाटील, सासरे यशवंत पाटील, शालक कल्पेश व जितू या सहा जणांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व सागर तडवी याला अटक करण्यात आली होती. मंगळवारी क्रांती हिला अटक करण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावArrestअटक