शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटीलकृत दडलेल्या मातृत्वाने दीन दुबळ्या कुडकुडत्या बालकांना दिली उबदार कपड्यांची उब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 15:16 IST

घराकडून शेतात जाताना रस्त्यातच असलेल्या आदिवासी भिल्ल वस्तीतील चिमुरडी बालकांना किमान २.२७ सेल्सिअंशपर्यंत तापमानाचा गोठलेल्या पाऱ्यातील थंडीत कुडकुडताना पाहून, माया, ममता व वात्सल्याचा असलेला पाझर फुटल्याने केºहाळे बुद्रूक येथील पोलीस पाटील वर्षा प्रवीण पाटील यांनी त्या दोन-तीन बालकांना घरातील जुनी स्वेटर व कपडे देऊ केले. मात्र त्यांच्या चेहºयावरील तरळणारा आनंद पाहून झालेले मनस्वी समाधान पाहता, त्यांनी वाड्या-पाड्यातील गृहिणींशी हितगुज साधून त्यांच्याकडून जुनी स्वेटर व वापरते कपडे भिल्ल- वस्तीतील आबालवृद्ध महिला-पुरुष व बालकांना स्वेटर व जुने वापरते कपडे वितरित करून पोलिस पाटीलकीच्या पालकत्वातील दातृत्वाने मातृत्वाचा आनंद लाभला आहे.

ठळक मुद्देरावेर तालुक्यातील केºहाळा बुद्रूक येथील पोलीस पाटील वर्षा पाटील यांच्या दातृत्वाला लाभला मातृत्वाची किनारइतरही महिला मदतीसाठी आल्या पुढे

रावेर, जि.जळगाव : घराकडून शेतात जाताना रस्त्यातच असलेल्या आदिवासी भिल्ल वस्तीतील चिमुरडी बालकांना किमान २.२७ सेल्सिअंशपर्यंत तापमानाचा गोठलेल्या पाऱ्यातील थंडीत कुडकुडताना पाहून, माया, ममता व वात्सल्याचा असलेला पाझर फुटल्याने केºहाळे बुद्रूक येथील पोलीस पाटील वर्षा प्रवीण पाटील यांनी त्या दोन-तीन बालकांना घरातील जुनी स्वेटर व कपडे देऊ केले. मात्र त्यांच्या चेहºयावरील तरळणारा आनंद पाहून झालेले मनस्वी समाधान पाहता, त्यांनी वाड्या-पाड्यातील गृहिणींशी हितगुज साधून त्यांच्याकडून जुनी स्वेटर व वापरते कपडे भिल्ल- वस्तीतील आबालवृद्ध महिला-पुरुष व बालकांना स्वेटर व जुने वापरते कपडे वितरित करून पोलिस पाटीलकीच्या पालकत्वातील दातृत्वाने मातृत्वाचा आनंद लाभला आहे.रावेर तालुक्यातील केºहाळा बुद्रूक येथील पोलीस पाटील वर्षा प्रवीण पाटील या महिला मजुरांना घेऊन घरच्या शेतात जात असताना त्यांना कडाक्याच्या २.२८ सेल्सिअंशवर गोठलेल्या पाºयातील थंडीत उघडी नागडी कुडकुडत्या चिमुरड्यांची अवकळा पाहून त्यांची माणुसकीतील सहृदयता अखेर ओशाळली. त्यांनी शेतातून घरी परतल्यानंतर घरात ठेवलेली जुनी वापरातील ऊबदार स्वेटर, शाल, ब्लँकेट, शर्ट, पॅन्ट, लहान मुलींचे फ्रॉक दोन तीन कुटुंबात वाटली. त्या कुटुंबातील लहान बालकांना रात्री त्या उबदार कपड्यांमधून मिळालेला दिलासा पुन्हा दुसºया दिवशी त्यांच्या चेहºयावर तरळणाºया आनंदातून ओसंडून वाहत होता.गावच्या पोलीस पाटीलकीतील पालकत्वात दडलेले ममत्व व दातृत्वाला त्या चिमुरड्यांच्या आनंद व हर्षोल्हासातून वर्षा पाटील यांना एक उत्स्फूर्तपणे ऊर्जा मिळाली. त्यांनी गावात घराघरातून अशी थंडीची जुनी व वापरती उबदार स्वेटर, कानटोपी, कांबळ, ब्लँकेट, शर्ट, पॅन्ट, साड्या व फ्रॉक्स जमा करण्यासाठी आर्त हाक देण्यासाठी आॅडियो रेकॉर्डींग केलेले मेमरी कार्ड ग्रामपंचायतच्या घंटागाडीवर लावून आधुनिक पध्दतीने दवंडी पिटवली. त्याला समृध्दीने नटलेल्या केºहाळे गाववासीयांनी तेवढ्याच सहृदयतेने प्रतिसाद दिला.वर्षा पाटील यांच्या वाड्यातील व गावातील तरुण मित्र मंडळ, दुर्गोत्सव मंडळ व गणेशोत्सव मंडळातील विशाल कुंभार, धीरज महाजन, यश महाजन, नीलेश सुतार, प्रफुल्ल सुतार, सुमित गायकवाड, भूषण महाजन, दीपक महाजन, राहुल महाजन, सौरव महाजन, अक्षय महाजन, शुभम महाजन, अनंत महाजन, किरण कुंभार, जयेश कुंभार, वैभव महाजन, देवाशिष महाजन आदींनी पोलीस पाटील वर्षा प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० कापूस वाहतुकीचे गोणे भरून उबदार थंडीचे स्वेटर, कानटोपी, कांबळ, ब्लँकेट, शर्ट, पॅन्ट, साड्या व फ्रॉक्स गोळा केले.मंगरूळ रस्त्यावरील भिल्ल-कोतील वाड्यातील सुमारे ५८ ते ६० कुटुंबातील लहान बालकांसह आबालवृद्ध महिला-पुरुषांना त्यांनी कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे वितरित करून मायेची उब दिल्याने त्यांच्या पोलीस पाटीलकीच्या पालकत्वात दडलेल्या दातृत्व व मातृत्वाला गोरगरीब उघड्या बालकांनी सलाम केला.