शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बदली प्रक्रिया: वर्षानुवर्षे एका विभागात असणाऱ्या अंमलदारांना सोडावं लागणार शहर!

By विजय.सैतवाल | Updated: July 10, 2024 00:07 IST

पहिल्या दिवशी ७८ सहाय्यक फौजदार, १७६ पोलिस हेड कॉन्सटेबल, ६७ पोलिस नाईक अशा एकूण ३२१ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: जळगाव जिल्हा पोलिस दलात सहाय्यक फौजदार ते पोलिस शिपायांपर्यंत कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविली जात असून मंगळवारी सहाय्यक फौजदार ते पोलिस नाईक पदापर्यंतच्या ३२१ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पोलिस शिपाई पदाच्या बदली प्रक्रियेसाठी बुधवारी मुलाखती होणार आहे. वर्षानुवर्षे शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांची शहराबाहेरील पोलिस ठाण्यात बदली निश्चित मानली जात आहे.

लोकसभा निवडणुकीसह पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या  बदल्यांना सुरुवात झाली आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी तीन पसंतीक्रमानुसार अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर दि. ९ जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोख नखाते, कविता नेरकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील  बदलीसाठी पात्र  सहाय्यक फौजदार, पोलिस हेड कॉन्सटेबल, पोलिस नाईक व पोलिस शिपाई या कर्मचाऱ्यांच्या   बदलीसाठी मुलाखतींना मंगळवारी सुरुवात झाली. या मुलाखतींमध्ये ७८ सहाय्यक फौजदार, १७६ पोलिस हेड कॉन्सटेबल, ६७ पोलिस नाईक या अंमलदारांची मुलाखत घेण्यात आली.  बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या बदल्यांसाठी मुलाखत होणार आहे.

जिल्हा पोलिस दलात काही कर्मचारी राजकीय दबाव, वैद्यकीय किंवा कौटुंबिक कारणे देवून अनेक  वर्षानुवर्षे शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये बदली करुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वर्षानुवर्षे येथे असणाऱ्या अमलदारांना शहराबाहेर  पाठविण्याचा पोलिस अधीक्षकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांकडून पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाचे स्वागत तर काही जणांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली