शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर जबरी चोरीतील साडेसहा लाख रुपये न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 20:49 IST

गिरिजा कॉलनीत झालेल्या जबरी चोरीप्रकरणातील रक्कम साडेसहा लाख रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी संबंधितास सोमवारी परत केले.

जामनेर : शहरातील गिरिजा कॉलनीत झालेल्या जबरी चोरीप्रकरणातील रक्कम साडेसहा लाख रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी संबंधितास सोमवारी परत केले.८ मे २०२० रोजी पहाटे वयोवृद्ध दाम्पत्य बळीराम माळी व मयत सुशीलाबाई माळी हे दोघे घरात झोपले असताना जीवे मारण्याची धमकी देत ८ लाख ५० हजार रुपये व सोने , चांदी असा ऐवज चोरून नेल्याची तक्रार जामनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.चोरीनंतर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपासाची चक्र फिरवीत अनेक संशयितांची चौकशी केली. परंतु पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत आरोपींना जेरबंद करून चोरीतील ६ लाख ६६ हजार ८६५ रु मुद्देमाल जप्त करण्यात आले होते. आरोपी सय्यद मोइजोद्दिन (उर्फ पुतळ्या) सय्यद मोकीमुद्दीन रा.जामनेर, आकाश उर्फ चॅम्पियन शाम इंगळे रा.भुसावळ, अमोल एकनाथ वाघ रा.तोंडापूर, ता.जामनेर, वसीम अहमद पिंजारी रा.मच्छीमार्केट, भुसावळ, जितू जितेंद्र किसन गोडाले रा.भुसावळ, सद्दाम शेख यासीन रा.जामनेर, शेख वसीम शेख कबिरुद्दीन रा.जामनेर यांनी फिर्यादी व त्यांची पत्नी यांना धमकी देऊन त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम रुपये असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे शाखा कर्मचारी व सपोनि धरमसिंग सुंदरडे, रियाज शेख, अमोल घुगे, सोनासिंग ढोबाळ यांनी सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपींकडून ६ लाख ६६ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. १९ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीस पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी पोलीस ठाण्यात बोलावून हस्तगत केलेली रक्कम परत दिली. दुर्दैवाने फिर्यादी बळीराम माळी यांच्या पत्नी सुशीलाबाई माळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेJamnerजामनेर