शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तामसवाडी येथील पोलीस पाटील व कुटुंबियांवर दारू विक्रेत्यांकडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 21:02 IST

जीवघेणी मारहाण, तिघे जखमी : दारु विक्रीस विरोध केल्याने काढला वचपा

मेहुणबारे, ता. चाळीसगाव : ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात गावठी दारू तयार करून विक्री करू नका असे सांगितल्याच्या रागातून तामसवाडी (ता.चाळीसगाव) येथील पोलीस पाटलांच्या कुटुंबावर दारू विक्रेत्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवार रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मारहाण झालेल्या पोलीस पाटील, त्यांची आई , पत्नी जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पत्नीच्या पोटात विक्रेत्यांनी लाथा मारल्याने त्या तीन ते चार तास बेशुद्ध होत्या. याप्रकरणी हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तामसवाडी येथे किरण भिल हे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. गावात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने गावात स्थापन केलेल्या समितीचे ते सचिव आहेत. गावातील रामसिंग सोनवणे हा गावठी दारूची विक्री करीत असल्याने त्याचेवर मेहूणबारे पोलीसात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. रविवार (ता.१२) रोजी रात्री नऊच्या सुमारास सोनवणे याच्या घरासमोर तीन ते चार अनोळखी लोक दिसून आले. त्यांना हटकले असता ते पळून गेले. त्यावेळी पोलीस पाटील हे रामसिंग सोनवणे यास घरासमोर गर्दी करू नको असे सांगण्यास गेले असता तुझ्यामुळे आमचा धंदा बुडत आहे असे सांगत शिवीगाळ केली. तसेच रामसिंग व त्याचा मुलगा अप्पा हे दोघे त्यांच्या अंगावर धावून गेले व लाथाबु्क्यांनी मारहाण केली. याबाबत किरण भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामसिंग सोनवणे, अप्पा सोनवणे, राजु सोनवणे, शाम सोनवणे, आकाश मेस्त्री, अविनाश सुरेश मेस्त्री सर्व रा. तामसवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आई व पत्नीलाही केली मारहाणकिरण भिल यांना मारहाण होत असताना त्यांची आई अनिताबाई व पत्नी रूपाली ह्या त्यांना वाचविण्यासाठी धावत आल्या असता रामसिंग व इतरांनी त्यांच्या आई व पत्नीसही मारहाण केली.