शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पोलीस भरतीची तयारी करणा-या दोघांनीच लुटले फायनान्स कर्मचाºयाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 16:46 IST

बळीराम पेठेतील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या कृषी बचत गटाचे हप्ते वसूल करुन येणा-या विजय धनराज बारी (वय २२ रा.जुना खेडी रोड, जळगाव) या कर्मचा-याला लुटणा-या विनोद मच्छिंद्र पाटील (वय २६) व सागर सदाशिव गरुड (वय २३) दोन्ही रा.बांबरुड राणीचे, ता.पाचोरा दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. चार महिन्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. दरम्यान, दोघंही तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहेत.

ठळक मुद्देवडली-वराड रस्त्यावर झाली होती लूटचार महिन्यानंतर गुन्हा उघड गुंतवणूकदारांची पैसे गेले होते

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २५ : बळीराम पेठेतील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या कृषी बचत गटाचे हप्ते वसूल करुन येणा-या विजय धनराज बारी (वय २२ रा.जुना खेडी रोड, जळगाव) या कर्मचा-याला लुटणा-या विनोद मच्छिंद्र पाटील (वय २६) व सागर सदाशिव गरुड (वय २३) दोन्ही रा.बांबरुड राणीचे, ता.पाचोरा दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. चार महिन्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. दरम्यान, दोघंही तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहेत.तालुक्यातील वडली-वराड रस्त्यावर ९ आॅक्टोबर २०१७ रोजी दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी विजय बारी यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याजवळील १ लाख १४ हजाराच्या रोकडसह लॅपटॉप व अन्य साहित्य असा १ लाख ४६ हजार ३३० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुंतवणूकदारांची पैसे गेले होतेलोणवाडी तांडा येथून सुनिता राठोड यांच्या गटाकडून २१ हजार ३०० रुपये, राखीबाई गोविंदा धाडी यांच्यागटाकडून १९ हजार १७०, लालचंद चव्हाण यांच्याकडून २१ हजार २००, धारा राठोड यांच्या गटाकडून १९ हजार ८०, गणेश तवर गटातील दिलीप चव्हाण यांच्याकडून १४ हजार ९९० असे एकुण ९५ हजार ६६० रुपये घेतले. तर आधीचे १९ हजार १७० रुपये जवळ होते. ही सर्व रक्कम घेऊन लोणवाडी तांडा येथून वराडमार्गे वडली येथे जात असताना १२.४५ वाजता वडली शिवारातील शेषराव रामकृष्ण पाटील यांच्या शेताजवळ मागून दुचाकीवरुन आलेली तिघांनी समोर दुचाकी आडवी लावून मारहाण करुन दीड लाखाचा ऐवज लुटून नेला होता. सहायक फौजदार अतुल वंजारी, शरद भालेराव, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर व सचिन मुंडे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने तिघांची माहिती काढली. त्यानंतर रविवारी सागर व विनोद या दोघांना अटक करण्यात आली.अशी झाली होती लूटदुचाकीवरील तिघांनी बारी यांना थांबवून एकाने दुचाकीची चावी काढली तर दुसºयाने कानशिलात लगावली. काही समजण्याच्या आत तिसºयाने पाठीला लावलेली बॅग काढली तेथून पोबारा केला. या बॅगेत १ लाख १४ हजार ८३० रुपये रोख, २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, १० हजार रुपये किमतीचे ग्राहकांना पावती देण्याचे मशीन, दीड हजार रुपये किमतीचे डोंगल असा १ लाख ४६ हजार ३३० रुपयांचा ऐवज लुटून नेला.