शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीबद्दल महिलांतर्फे पोलिसांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 19:17 IST

उत्कृष्ट कार्याबद्दल मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नावे यांचा सत्कार

मुक्ताईनगर, जि.जळगाव : पोलिसांबद्दल कायम नकाराची भावना व नकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठीदेखील पोलीस हे किती महत्त्वपूर्ण ठरू शकतात याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो. तसेच शहाण्याने पोलिसांची पायरी चढू नये असे म्हणतात, मात्र शहाण्याने मोठेपणा दाखवत पोलिसांच्या कार्याचा गौरव करणे हेदेखील तेवढेच आवश्यक असल्याचे वरणगाव व सावदा येथील महिलांनी दाखवून दिले आहे.मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे यांच्या पथकाने गेल्या काही दिवसात वरणगाव नगरपालिका हद्द तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत आणि सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत विविध ठिकाणी अवैध गावठी दारू अड्ड्यांवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात गावठी दारूचे अड्डे नष्ट केले आहेत. गावठी दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने महिलांना या व्यवसायाचा फार मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र पोलिसांची असलेली मिलीभगत यामुळे दारू दुकानदार यांचे फावत होते. मात्र मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे यांनी त्याला अपवाद दाखवत गेल्या काही दिवसांमध्ये वरणगाव व सावदा या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाया केल्या. या कार्यामुळे आपले संसार उद्ध्वस्त होण्यापासून नक्कीच वाचतील म्हणून काही महिलांनी मुक्ताईनगर येथे पोलिस उपविभागीय कार्यालयात येऊन सुभाष नेवे व पोलीस कर्मचारी अक्षय हिरोळे यांचा सत्कार केला. एवढेच नव्हे तर इतर पोलीस पथकातील सर्व कर्मचाºयांच देखील त्यांनी याप्रसंगी गौरव केला.महिला पोलीस पंचायत, सिध्देश्वरनगर वरणगाव व वाघोदा बुद्रूक, ता.भुसावळ येथील महिला रागिणींमार्फत मुक्ताईनगर येथे करण्यात आला. याप्रसंगी सविता माळी (विभाग सचिव, ओबीसी फाऊंडेशन इंडिया कृत माळी सेवा महासंघ, माहिला आघाडी, खान्देश) व महिला पोलीस पंचायत, सिध्देश्वरनगर वरणगाव व सोनाली महाजन व इतर महिला वाघोदा बुद्रूक, ता.भुसावळ तसेच इतर महिलादेखील उपस्थित होत्या.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर