शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पोलीस मदत केंद्रालाच मदतीची गरज

By admin | Updated: February 15, 2017 00:29 IST

पोलिसांअभावी पडलेय ओस : कजगाव आणि परिसराची सुरक्षा वा:यावर, दखल घेण्याची मागणी

कजगाव, ता. भडगाव : गेल्या 22 वर्षापूर्वी स्थापन झालेले कजगावचे  पोलीस मदत केंद्र पोलिसांविना ओस पडू पाहत आहे.  या केंद्रावर कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करून कर्मचारी चौकीवर आहेत की नाही याची अधिका:यांनी नियमित चौकशी करावी अशी मागणी कजगाव व्यापारी असोसिएशनने केली आहे.गेल्या 22 वर्षापूर्वी नागरिकांच्या ठोस मागण्यांमुळे कजगावला पोलीस मदत केंद्र मंजूर झाले होते. या केंद्रावर चार पोलिसांची नियुक्तीही झाली होती. पोलीस मदत केंद्र सुरू झाल्याने परिसरात होणा:या चो:यांवरही आळा बसला. तसेच दारू पिऊन धिंगाणा घालणा:यांनादेखील चांगलाच चाप बसल्याने शांतता निर्माण झाली होती.कजगाव महत्त्वपूर्ण गावभडगाव तालुक्यातील भडगावप्रमाणेच महत्त्वपूर्ण असलेल्या कजगाव येथे रेल्वे स्टेशन आहे. बरोबरच केळी व कापसाची मोठी बाजारपेठ  असल्याने केळी, कापूस घेणा:या व्यापा:यांची येथे ये-जा असते, तर परिसरातील 40 खेडय़ांमधून कापूस व केळी कजगावच्या बाजारपेठेत येते. यामुळे या व्यवसायातून मोठी उलाढाल येथे दररोजची असते. मात्र सुरक्षा वा:यावर असल्याचे चित्र आहे.कायमस्वरूपी नेमणूक गरजेचीरेल्वे स्टेशन असण्याबरोबरच 10 कि.मी.वर जिल्हा हद्द बदलत असलेल्या या गावास सुरक्षा  महत्त्वाची आहे. व्यापारी उलाढाल हादेखील एक महत्त्वाचा भाग आहे. या सर्वच बाबींकडे  जिल्हा पोलीस  अधीक्षक  जालिंदर सुपेकर, सहायक पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी तत्काळ लक्ष देऊन कजगाव मदत केंद्रावर एक फौजदार, दोन हेड कॉन्स्टेबल व चार कॉन्स्टेबल अशी नेमणूक करावी. यात रात्रपाळीसाठी कायमस्वरुपी दोन तसेच दिवसा दोन कॉन्स्टेबलची नेमणूक करावी व चौकीवर  कर्मचारी आहेत किंवा नाही याची चौकशी करावी, अशीही मागणी आहे.औट पोस्टसाठी आमदारांनी लक्ष द्यावेव्यापार दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या कजगावात पोलीस मदत केंद्र देण्यात आले आहे. या मदत केंद्राचे रूपांतर शासन दरबारी ठोस पाठपुरावा करून औट पोस्टमध्ये करावा. हे केंद्र औट पोस्ट झाल्यास नियमानुसार कर्मचा:यांची संख्यादेखील वाढेल. याबाबीकडे आमदार किशोर पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालून औट पोस्टसाठी शासन दरबारी प्रयत्न करावे, अशी मागणी  होत आहे. (वार्ताहर)भडगाव पो.स्टे.अंतर्गत एक कोळगाव औट पोस्ट व दुसरे कजगाव मदत केंद्र  असून या मदत केंद्रास  गिरणा नदीच्या अलीकडील 15 गावे जोडण्यात आली. यात नावरे, वाडे, दलवाडे, गोंडगाव, बांबरुड, लोण, बोरनार, बोदर्डे, कनाशी, पासर्डी, कजगाव, भोरटेक, तांदूळवाडी, मळगाव, देव्हारी या गावांचा समावेश करून मदत केंद्राचा परिसर वाढविण्यात आला. म्हणजेच कोळगाव औट पोस्टचा अर्धा भाग कजगाव चौकीला जोडण्यात आला.