शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ट्रीगर दाबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटून चोपड्यातील पोलीस गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:37 IST

रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसाने खांद्याला लावलेल्या बंदुकीचा पट्टा घट्ट करतांना ट्रीगर दाबला जाऊन गोळी सुटल्याने हा पोलीस गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देरात्रीच्या गस्तीवर असतांना घडली घटनागंभीर जखमी पोलिसावर जळगावला खासगी रुग्णालयात उपचार सुरू पोलीस निरीक्षकाने वरीष्ठांकडे पाठविला अहवाल

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.३ : येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उमेश बळीराम धनगर ( वय ३८) हे रात्रीच्या ड्युटीदरम्यान स्वत:जवळील बंदुकीची सिलिंग टाईट करीत असताना अंधारात ट्रीगर दाबला गेल्याने गोळी सुटून गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. जखमी पोलिसावर जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.पोलीस सूत्रानुसार, उमेश धनगर हे २ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता एसएलआर बंदूक घेऊन सातपुड्यातील तेल्याघाट येथे रात्रीच्या गस्तीसाठी गेले होते. दरम्यान १०: ३० वाजेच्या सुमारास चोपडा ते बोरअजंटी दरम्यान त्यांनी खांद्याला लावलेल्या बंदुकीची सिलिंग (पट्टा) बंदुक जमीनीवर उभी ठेऊन घट्ट करीत असताना अंधारात ट्रीगर दाबला गेला. त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटून ती उमेश धनगर यांच्या डाव्या खांद्याखाली लागून आरपार निघाली. त्यात ते गंभीर जखमी झाले.जखमी अवस्थेतही त्यांनी मोबाईलवरून पोलीस स्टेशनला ही घटना कळवली. त्यामुळे त्यांना तात्काळ चोपडा येथे आणण्यात येऊन खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले.सदर घटनेने पोलीस विभागात खळबळ माजली असून घटनास्थळी चोपडा शहर पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, राजेंद्र महाजन, प्रवीण मांडुळे, संदीप धनगर व संदीप पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी सदर बंदूक व ९ जीवंत काडतुसे व एक फायर झालेल्या गोळीची पुंगळी असा मुद्देमाल जप्त केला आहे. 

टॅग्स :Policeपोलिस