शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भुसावळात पोलिसांचे कोंबिंग आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:32 IST

भुसावळ शहरात पोलिसांनी बुधवारी पहाटे कोंबिंग आॅपरेशन राबविले. त्यात दोन गावठी कट्टे हस्तगत करून दोन जणांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देपुन्हा दोन गावठी कट्टे हस्तगतदोन जणांना अटकशहर व बाजारपेठ पोलिसांची कारवाई

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहरात पाच जणांचे हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी पहाटे कोंबिंग आॅपरेशन राबविले. त्यात पुन्हा दोन गावठी कट्टे हस्तगत करून दोन जणांना अटक करण्यात आली. पहिली कारवाई बाजारपेठ व शहर पोलिसांनी केली.शहरातील समता नगर व आरपीडी रोडवर रविवारी गावठी कट्टा त्याचप्रमाणे चॉपरचा वापर करून तब्बल पाच लोकांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात नव्हेतर राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, हे हत्याकांड घडण्यापूर्वी शहरात सलग दोन दिवस गावठी कट्टे ताब्यात घेऊन चार लोकांना अटक करण्यात आली. त्यामुळे शहरात गावठी कट्ट््याचा महापूर आला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पाच जणांच्या हत्याकांडानंतर कायदा व सुव्यवस्थेचे चांगले धिंडवडे निघाले. त्यामुळे ९ रोजी पहाटे शहरात कोम्बिंग आॅपरेशन करून कारवाई केल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशावरुन बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोबिंग आॅपरेशन करण्यात आले. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे संशयित आरोपी रमाकांत वेडू वाघ (वय ४२, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) हा बुधवारी पहाटे साडेतीनला भुसावळ शहरात नाहाटा चौफुली भागात पाण्याच्या टाकीजवळ त्याच्या कब्जात विना परवाना गावटी कट्टा व जिवंत काडतुसह मिळून आले आहे. १५ हजार रुपये किमतीचा एक लोखडी गावठी कट्टा (पिस्तूूल), कट्ट्याच्या दोही बाजूस प्लॅस्टिकचे ग्रीप असलेली व पाच हजार रुपये किमतीच्या एक जिवंत कारतुडसह एकूण २० हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. आरोपी वाघ याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई डीवाय. एस.पी.गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रावसाहेब कीर्तिकर, पो.हे.काँ.सुनील जोशी, पो.ना. रवींद्र बिºहाडे, रमण सुरळकर, पो.काँ. विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, संदीप परदेशी आदींनी केली. तपास पो.हे.काँ.सुनील जोशी करीत आहेत.प्रभाकर हॉलजवळ कंपनीचे कट्टा हस्तगतदुसऱ्या कारवाईत शहर पोलीस स्टेशन हद्दीत प्रभाकर हॉलजवळ संशयित आरोपी नितीन समाधान इंगळे (वय २९, रा.सहकारनगर, गुरूद्वारजवळ ) गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शेख साहिल, पो.कॉ. संजय पाटील, जुबेर शेख, सोपान पाटील आदींच्या पथकास सूचना दिल्या. या पथकाने आरोपीस अटक केली. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे मेड इन स्पेन या कंपनीचा कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत केली व त्यास अटक केली. यासंदर्भात सोपान पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुपडा पाटील करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ