शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे जुगाऱ्यांकडून पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 22:25 IST

पहूर, ता. जामनेर : पेठगावातील बडा मोहल्ला भागात स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने जुगार खेळताना छापा मारून माजी उपसरंपचासह चौघांना रंगेहाथ ...

पहूर, ता. जामनेर : पेठगावातील बडा मोहल्ला भागात स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने जुगार खेळताना छापा मारून माजी उपसरंपचासह चौघांना रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी घडली. या कारवाईला काही जणांनी विरोध करीत एलसीबीच्या एका पोलिसांला धकाबुक्की घडल्याचा प्रकार समोर आला आहे.या कारवाई दरम्यान काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कारवाईबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ गावातील बडा मोहल्ला येथे जुगार सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली त्यानुसार या ठिकाणी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लाहरे, सहायक फौजदार, अशोक महाजन, वैशाली महाजन, विजय पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, अशोक पाटील यांनी छापा मारला.यावेळी जुगार खेळताना माजी उपसरंपच ईक्रामोद्दीन समसोद्दीन, शहिस्तेखान नय्यीम खान पठाण, अमिर सैय्यद गुलाब, इकबाल शेख लतीफ, रसुलखान नयीमखान यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. विजय पाटील यांच्या फियार्दीवरून वरील पाच जणांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीनावर यांना सोडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर जुगाऱ्यांच्या ताब्यातून पत्ते,पाच मोबाईल व बारा हजार रोख जप्त केले आहे.कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील विजय पाटील यांना तेथील काही जणांनी विरोध करीत धकाबुक्की केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच कारवाई दरम्यान जुगाराच्या ठिकाणी पोलिसांनी तलवारही जप्त केल्याचे बोलले जात असून पोलिसांनी तक्रारीत तलवार दाखवली नसल्याने पोलीसांची भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. तर अवैधधंदे बंद असल्याची वल्गना करणाºया पहूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचा पुरावा या कारवाईने समोर आला आहे.अवैधधंद्यावाल्याना पाठीशी घालणाºया पोलिसांचा धाक संपुष्टात आल्याचे या घटनेमुळे समोर आले असून पोलीसांसह नागरीकांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे बोलले जात आहे.