शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतूकदारांच्या खब-यांवर करणार गुन्हे दाखल, जळगावात तीन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:46 IST

महसूल कर्मचा-यांची सुरक्षा व वाहतुकीला अटकावसाठी हत्यार

ठळक मुद्दे51 हजाराचा दंड वसूल प्रांताधिका-यांकडे बंधपत्र करण्याबाबत सूचित

जळगाव : विविध उपाय करूनही वाळू वाहतूक सुरूच असल्याने त्याला आळा घालण्यासाठी वाहतूकदारांच्या खब:यांचाही बंदोबस्त होणे गरजेचे असल्याच्या दृष्टीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली महसूल विभागात सुरू आहे. दरम्यान, बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी एकूण वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले असून त्यांच्याकडून प्रत्येकी 17 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. वाळू वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई सुरूच आहे. असे असले तरी वाळू वाहतूक काही थांबत नसल्याचे चित्र आहे. वाळू वाहतूक सुरू असताना वाहतूकदारांचे सहकारी जागोजागी थांबून कोण येते, कोणते पथक कोठे जाते याकडे लक्ष ठेवतात व याबाबत वाळू वाहतूकदारांना सतर्क करीत असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी संबंधितांना माहिती दिल्याने अवैध वाळू वाहतुकीस मदत होते. प्रसंगी महसूल कर्मचा:यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून वाळू वाहतूकदारांपाठोपाठ आता त्यांच्या मागे-पुढे असणा:या खब:यांवरही गुन्हे दाखल करण्यात येण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

51 हजाराचा दंड वसूलगुरुवारी सकाळी शिरसोली येथे तर बुधवारी रात्री आकाशवाणी चौक तसेच शिवाजीनगरात वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळून आल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी कारवाई करीत हे ट्रॅक्टर तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. प्रत्येकी एका ट्रॅक्टरला 17 हजार असा एकूण 51 हजाराचा दंड करण्यात येऊन प्रांताधिका-यांकडे बंधपत्र करण्याबाबत सूचित करण्यात आले.