शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव बसस्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले चोरट्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:49 IST

हाताची घडी घालून शेजारच्या प्रवाशाच्या शर्टाच्या खिशात असलेला मोबाईल चोरताना रईस उर्फ बाबा समशेर खान पठाण (वय १८, रा. गेंदालाल मील,जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या साध्या गणवेशातील पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नवीन बसस्थानकात रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार होण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. 

ठळक मुद्दे गस्तीवर कर्मचारी वाढविल्याचा फायदा जबरी चोरीचा गुन्हा दाखलचोरट्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,९ : हाताची घडी घालून शेजारच्या प्रवाशाच्या शर्टाच्या खिशात असलेला मोबाईल चोरताना रईस उर्फ बाबा समशेर खान पठाण (वय १८, रा. गेंदालाल मील,जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या साध्या गणवेशातील पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नवीन बसस्थानकात रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार होण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर येथील रहिवाशी साबीरखॉ मुनीरखॉ पठाण (वय ६०) हे तहसील कार्यालयात अवर कारकून म्हणून निवृत्त झाले आहेत. पेन्शनच्या कामासाठी ते गुरुवारी जळगावात आले होते. दिवसभर काम आटोपल्यानंतर सायंकाळी ते बसस्थानकात आले. सहा वाजेच्या जळगाव-अमळनेर बसमध्ये चढत असताना रईस हा हाताची घडी घालून त्यांच्या शेजारी थांबून बसमध्ये चढण्याचे नाटक करीत होता. रईस हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याने तेथे ड्युटीला असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे सूरज पाटील व दीपक पाटील यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले होते. हाताची घडी असताना साबीर खॉ यांच्या शर्टाच्या खिशातून त्याने अलगद मोबाईल काढला. हा प्रकार साबीर खॉ यांच्या लक्षातही आला नाही. ते बसमध्ये चढले तर पोलिसांनी चोरट्याला पकडून ठेवले. त्यानंतर सूरज पाटील यांनी साबीरखॉ यांना बसमधून उतरवून मोबाईल चोरीचा प्रकार लक्षात आणून दिला. या चोरट्याला तेथून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले.

वाढत्या चो-यांमुळे वाढविली गस्तबसस्थानकातून दरराज मोबाईल व पैसे चोरी जाण्याचे प्रकार घडत असल्याने अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बसस्थानकात गर्दीच्या वेळी कर्मचारी वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी त्यांचे साध्या गणवेशातील दोन कर्मचारी बसस्थानकात तैनात केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून हा चोरटा हाती लागला. कुराडे यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनलाही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला  त्याच्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.