शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जळगावात ‘मविप्र’ कार्यालयाचा पोलिसांनी केला पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:07 PM

संस्थेचा ताबा घेण्याच्या कारणावरुन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात शनिवारी झालेल्या तोडफोड प्रकरणात रविवारी जिल्हा पेठ पोलिसांनी कार्यालयात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, संस्थेच्या दोन्ही गटाचा वाद पाहता संस्थेच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंस्थेच्या कार्यालयात बंदोबस्त कायम भोईटे गटातर्फे नवीन संचालक मंडळाचे लावले फलकआरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि १८ :  संस्थेचा ताबा घेण्याच्या कारणावरुन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात शनिवारी झालेल्या तोडफोड प्रकरणात रविवारी जिल्हा पेठ पोलिसांनी कार्यालयात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, संस्थेच्या दोन्ही गटाचा वाद पाहता संस्थेच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.‘मविप्र’ ही संस्था दोन कायद्यान्वये नोंदणी असल्याने धर्मदाय आयुक्तांच्या कायद्याप्रमाणे निलेश भोईटे यांनी संस्थेवर हक्क सांगितला आहे तर सहकार कायद्याने निवडणुकीत आपला गट विजयी झाल्याने त्यावर नरेंद्र भास्कर पाटील गटाने हक्क सांगितला आहे. या वादात शनिवारी भोईटे गटाने संस्थेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भोईटे गट व नरेंद्र पाटील गटात वाद झाला. यात संस्थेच्या कार्यालयाचे तसेच सभागृहाचे कुलूप तुटले आहे,  भोईटे गटाने चेअरमन जगन्नाथ गंगाराम पवार व मानद सचिव निलेश रणजित भोईटे यांच्या नावाच्या पाट्या लावल्या तसेच त्यांच्या गटाचे संचालक मंडळाचे बॅनरही लावले होते. हे बॅनर फाडण्यात आले आहे. उपनिरीक्षक गिरधर निकम, एन.बी.सूर्यवंशी, महेंद्र बागुल, शिवाजी धुमाळ, उमेश पाटील आदींचा ताफा पंचनाम्यासाठी गेला होता. यावेळी भोईटे गटाकडून जयवंत भोईटे व नरेंद्र पाटील गटाकडून मनोज पाटील यांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.

भोईटे गटातर्फे २३ तर पाटील गटातर्फे ११ जणांविरुद्ध तक्रारया वादात नरेंद्र पाटील गटाने १० हजार रुपये रोख व सोन्याची साखळी काढून पलायन केल्याची तक्रार निलेश भोईटे यांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी या गटाकडून मारहाण देखील झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर लिपीक पराग रवींद्र कदम यांनीही दिलेल्या तक्रारीत योगेश भोईटे व संजय निंबाळकर यांनी मारहाण करुन ५ हजार रुपये तर राजेंद्र वराडे व रमेश धुमाळ यांनी दोन तोळ्याची सोन्याची साखळी ओढून नेल्याची तक्रार दिली. कदम यांनी ११ जणांविरुध्द तक्रार दिली आहे तर निलेश भोईटे यांनी २३ जणांविरुध्द तक्रार दिली आहे.