शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला उडवले, दोघांना शिक्षा

By admin | Updated: January 17, 2017 23:29 IST

सत्र न्यायालयाचा निकाल : सात हजार रुपये दंडही

भुसावळ : चोरीची कार अडवताना चोरट्यांनी वरणगाव येथे पोलिसाला उडवल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना २०१० मध्ये घडली होती़ या प्रकरणी दाखल खटल्यातील संशयीत दोघा आरोपींना अतिरिक्त सत्र न्या़एसक़ेक़ुलकर्णी यांनी दोन खटल्यांमध्ये प्रत्येकी सात व दोन वर्षांची शिक्षा सुनावली़खटल्याची माहिती अशी की, मुंबई येथून चोरलेली चारचाकी जळगावात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली होती मात्र चोरट्यांनी नाकाबंदी दरम्यान बॅरीगेटस तोडत सुसाट वाहन भुसावळ, वरणगावमार्गे मलकापूरकडे पळवले होते़ चारही ठिकाणी चोरट्यांनी बॅरीगेटस तोडून पोलिसांच्या अंगावर चारचाकी वाहन नेल्याप्रकरणी चारही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता तर वरणगाव येथे पोलीस कर्मचारी दिलीपसिंग आत्माराम चौधरी यांना बॅरीगेटस लावताना चोरट्यांनी उडवल्याने ते गंभीर जखमी झाले होते़भुसावळ तालुका पोलीस ठाण्यासह वरणगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि ३०७ व ३५३ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता़ घटनेनंतर २० जुलै २०१० पासून आरोपी कारागृहात होते़भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले तर वरणगावच्या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले़ दोघा बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पहिल्या खटल्यात सात वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा तर दुसºया खटल्यात दोन वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारतर्फे अनुक्रमे संजय सोनवणे व अ‍ॅड़विजय खडसे यांनी युक्तीवाद केला़ कार चोरीतील संशयीत आरोपी मुंबईचे४संशयीत आरोपी  गुरुमुखसिंग कश्मिरसिंग गिरवेल व राहुल नाणकचंद ढाकोलिया (कामठीपुरा, मुंबई) यांनी मुंबई येथून चारचाकी चोरली होती व ते भरधाव वेगाने जळगावकडे येत असताना नाकाबंदी लावण्यात आली मात्र आरोपींनी वाहन सुसाट नेत बॅरीगेटस् तोडले होते़ आरोपींविरुद्ध मलकापूर व जळगाव येथे खटला दाखल केल्यानंतर त्यात त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती मात्र मुंबई येथे कार चोरीच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा लागली तसेच भुसावळ तालुका व वरणगाव पोलिसात दाखल गुन्ह्यातही त्यांना अनुक्रमे सात वर्ष व दोन वर्ष शिक्षा सुनावण्यात आली़