शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावातील पोळा..अन् मानाचे नारळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 12:41 IST

परंपरा : बहाळ दरवाजातून फुटतो पोळा

ठळक मुद्देनारळाचे बांधले जाते तोरण   नारळ मिळवणारा ठरतो मानकरी बघ्यांची उसळते गर्दी

ऑनलाईन लोकमत /  जिजाबराव वाघ

चाळीसगाव, जळगाव, दि. 20 -  अनेकविध सांस्कृतिक पदर असणा:या चाळीसगावात सण-उत्सवाच्या परंपराही आहेत. विशेष म्हणजे त्या तेवढय़ाच जोशपूर्ण व उत्साही वातावरणात जपल्या जातात. पोळा आणि मानाचे नारळ..ही अशीच एक परंपरा. पोळ्याच्या दिवशी बहाळ दरवाजाला नारळाचे तोरण बांधले जाते. बैलांसोबत वेगाने धावत येऊन उंचावरवरील तोरणाचे नारळ मिळवायचे. नारळ मिळविणारा अर्थातच मानकरी ठरतो आणि पोळाही फुटतो. पशुपालन मोठय़ा प्रमाणावर चाळीसगाव शहरात गो-पालन (म्हशीदेखील) पालन करणारा गवळी समाज मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहे. काही भागात ते एकसंख्येने राहतात. शहरात तीन ते चार मोठे गवाळीवाडेही आहेत. ग्रामीण भागात शेतीला पूरक म्हणून पशुपालन केले जाते. त्यामुळे बैलाला बालपणापासून काळजीपूर्वक वाढविण्यात येते. खुराकही दिला जातो. जीवाचे मैतर असणा:या सर्जा-राजाला मोठय़ा मायेने वाढविले जाते. त्यामुळेच पोळा हा सण  येथील शेतक:यांसह गवळी समाजास आनंदासह परंपरा जपण्यास बळ देतो.नारळाचे तोरण  जुन्या न.पा. इमारतीखाली पूर्वी गावात जाण्यासाठी दरवाजा केला आहे. यालाच बहाळ दरवाजाही संबोधले जाते. येथे या दरवाजाला मानाच्या नारळाचे तोरण बांधले जाते. पोळ्याच्या दिवशी सायंकाळी नारळ मिळवण्याचा उत्सव रंगतो. शहरासह आजूबाजूच्या खेडय़ातील शेतकरी आपापले सर्जा-राजा सजवून येथे घेऊन येतात. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत एकेक करून तोरणाचे नारळ तोडण्याची जणू स्पर्धाच रंगते. नारळाचा मानकरी एका हाताने बैलाचा दोर घट्ट पकडून वेगाने पळत येऊन दुस:या हाताने उंच उडी मारत नारळ मिळविणारा पोळ्याचा मानकरी ठरतो. सर्जा-राजा, ढवळ्या-पवळ्यांच्या गळ्यातील घुंगरमाळांच्या निनादासह जल्लोषात पोळा फुटतो. सायंकाळी पोळा फुटण्याचा उत्सव पाहण्यासाठी गर्दी उसळते.  हौस म्हणून बैलांचे पालनपोषणशहराच्या लगत काही व्यवसायिक, उद्योगपती, राजकीय व्यक्ती, डॉक्टर्स यांची फार्महाऊस स्वरुपातील शेती आहे. हौस म्हणून तेही बैलांचे पालनपोषण करतात. पोळा उत्सवात त्यांचेही  बैल  सहभागी होतात. गेल्या काही वर्षात यामुळे बैलांची संख्या वाढली आहे. पोळ्या पूर्वी बैल विकत घेऊन त्याची ऊसतोडी हंगामासाठी पूजा करण्याची प्रथा येथील बंजारा बांधवांमध्ये आहे. त्यामुळे गुरांच्या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. कल्ला आणि टाळ्याबरसणा:या श्रावणसरी, पावसाची रिपरिप, चिखल अशा आनंद झडीत पोळा फोडण्याचा उत्सव रंगतो. यंदा पावसाने पंधरा दिवसांचा ‘ब्रेक’ घेत पोळ्यापूर्वी दणक्यात ‘कमबॅक’ केल्याने पोळ्याचा जोश वाढला असून पोळा फोडण्याचा उत्सवही जल्लोषात साजरा होणार आहे. एकमेकांना ‘टशन’ देत फुरफुरणा:या सर्जा-राजांच्या सहभागाने सालाबादाप्रमाणे यंदाही पोळ्याचा उत्सव संस्मरणीय ठरणार आहे.