शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी मिळकत धारकांचे नळ संयोजन होणार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST

मनपा स्थायी समिती सभेत निर्णय; मक्तेदाराकडून २४ मजूर पुरविण्यास मंजूरी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- मालमत्ता करापोटी गेल्या काही वर्षांपासून ...

मनपा स्थायी समिती सभेत निर्णय; मक्तेदाराकडून २४ मजूर पुरविण्यास मंजूरी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- मालमत्ता करापोटी गेल्या काही वर्षांपासून थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना वारंवार नोटीस बजावून देखील थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाई म्हणून नळ संयोजन खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी मक्तेदारामार्फत २६ दिवसांसाठी २४ मजूर पुरविण्याच्या ठरावाला सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

मनपा स्थायी समितीची सभा सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीव्दारे घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त सतीष कुलकर्णी, अप्पर आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. प्रभाग क्र. १ ते ४ मधील थकबाकीदार मिळकतधारकांकडील नळ संयोजन खंडित करण्यासाठी मक्तेदाराकडून २६ दिवस मजूर पुरविण्यात येणार्‍या ३ लाख ४० हजार ८० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.अतिक्र मण निर्मुलन विभागाला मिळणार २० कर्मचारी मनपाच्या अतिक्रमण विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी होणार्‍या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाकडील २० कर्मचारी दोन महिन्यांसाठी अतिक्रमण विभागाला देण्याबाबतचा निर्णय स्थायी समिती सभेत घेण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाकरीता कंत्राटी तत्वावर पवार यांची नियुक्ती स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०-२१ करीता महेंद्र पवार यांची कंत्राटी तत्वावर शहर समन्वयक म्हणून सहा महिन्यांकरीता तात्पुरती नियुक्ती करण्यात आली असून, त्यासाठी येणार्‍या २ लाख १० हजार खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विषय पत्रिकेवरील नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.