खड्ड्यांची दैना, भाजप-सेना है ना..
शहराचा चेहरा-मोहरा वर्षभरात बदलून दाखवू, असे सांगत गिरीशभाऊंच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही भाजपला सत्तेत आणले होते. आणि भाऊंनीदेखील चेहरा-मोहरा बदलवून दाखवला ना भाऊ..आधी खड्डे नव्हते, धूळ नव्हती, कचरा नव्हता आता सगळं आहे. भाऊंनी खरच आश्वासन खरं करून दाखवलं ना भाऊ. आता शिवसेनापण सत्तेत आली आहे. त्यांना आम्ही सत्तेत आणले नव्हते तरी पण ते आले; परंतु ते पण भाजपपेक्षा कमी नाही, जे खड्डे होते रस्त्यांमध्ये ते अजूनही कायम आहेत. आता ते आणखीन वाढत आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या काळात रस्त्यांवर एक फुटाचे खड्डे होते. आता तर दोन फुटाचे झाले आहेत. आधी धूळही डोळ्यांनाच त्रास देत होती. आता तर रस्त्यावरची धूळ नाक, कान, घसा, डोळे सर्वच अंगाला त्रास देते. त्यामुळे खड्ड्यांची दैना, भाजप-सेना हैना... असेच म्हणावे लागत आहे.