शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

 जळगावातील देवेंद्र नगरात प्ले स्कूलच्या संचालिकेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:10 IST

शहरातील वाघ नगरातील फन प्ले स्कूलच्या संचालिका अंजली दिनेश थोरात (वय ४३, रा.देवेंद्र नगर, जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. अंजली यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.मात्र माहेरच्या लोकांनी संशय व्यक्त करुन पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देराहत्या घरातच घेतला गळफास   आत्महत्येचे कारण अस्पष्टमाहेरच्यांनी व्यक्त केला संशय

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,५: शहरातील वाघ नगरातील फन प्ले स्कूलच्या संचालिका अंजली दिनेश थोरात (वय ४३, रा.देवेंद्र नगर, जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. अंजली यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.मात्र माहेरच्या लोकांनी संशय व्यक्त करुन पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मुलाने दरवाजा उघडताच आईचा मृतदेह दिसला...याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अंजली थोरात या पती दिनेश सुरेश थोरात व मुलगा श्रेयस (वय १०) यांच्यासह देवेंद्र नगरात राहत होत्या. सोमवारी पती एका कार्यक्रमानिमित्त मेहरुण येथे गेले होते तर मुलगा श्रेयस हा शाळेत गेलेला होता. 

दुपारी अडीच वाजता मुलगा शाळेतून घरी आला तेव्हा दरवाजा उघडताच आई अंजली या गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेल्या होत्या. घाबरलेल्या श्रेयस याने दप्तर तसेच फेकून देत शेजारी धावत गेला.आईने गळफास घेतल्याचे शेजारच्यांना सांगितले. त्यामुळे शेजारच्या लोकांनी तत्काळ धाव घेतली असता त्या मयत स्थितीत आढळून आल्या. त्यांनी ही माहिती पती दिनेश यांना दिली तर काही जणांनी रामानंद नगर पोलिसांना कळविली.

चिठ्ठी किंवा संशयास्पद वस्तू नाहीघटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक प्राची राजूरकर व किरण धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करताना त्यांनी काही संशयास्पद वस्तू मिळते का? याचा शोध घेतला, मात्र चिठ्ठी किंवा अन्य कोणती वस्तू आढळून आली नाही, त्यामुळे अंजली यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. चौकशी अंतीच कारण स्पष्ट होईल, असे राजूरकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.