धुळे : प्लॅस्टिक पिशव्यांचा वाढता वापर हानिकारक असल्याने आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी प्लॅस्टिक पिशव्यांना पुन्हा एकदा बंदी केली आहे. त्यामुळे मनपा कर्मचा:यांकडून दररोज शहरातून प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या जात आहेत़ प्लॅस्टिक पिशव्याबंदीचा निर्णय, कारवाई व परिणामांबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी ‘लोकमत ’ चमूतर्फे सव्रेक्षण करण्यात आल़े‘लोकमत’ने पाचकंदील परिसरात 20 विक्रेते व ग्राहकांची मते जाणून घेतली़ शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचे तीन होलसेल विक्रेते असून त्यांच्याकडून एजंटच्या माध्यमातून पिशव्यांची विक्री होत़े 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री करण्यावर शासनाने बंदी घातली आह़े तरीदेखील बाजारातील विविध भाजी विक्रेते, फळविक्रेते व किराणा दुकानांमध्ये आजही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आह़े त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांनीदेखील नियमानुसार कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी योग्य असल्याचे मत व्यक्त केल़े परंतु मनपाची कारवाई योग्य नसल्याचे मत ग्राहक व विक्रेत्यांनी नोंदविल़े मनपाचा कुणीही कर्मचारी येईल व पिशव्या उचलून घेऊन जाईल, अशा पद्धतीने दहा वर्षे कारवाई केली, तरी हा पिशव्यांचा वापर रोखला जाऊ शकत नाही़ त्यासाठी कमी जाडीच्या पिशव्यांचे उत्पादनच रोखावे लागेल, असे रोखठोक मत अनेकांनी व्यक्त केले. एका विक्रेत्याने याबाबत प्रतिक्रिया देताना शासनाच्या गुटखाबंदी निर्णयाचादेखील दाखला दिला़ एकीकडे गुटखाबंदी करायची व दुसरीकडे गुटख्यातून अधिक महसूल मिळवायचा, असाच प्लॅस्टिक पिशव्यांचा प्रकार असल्याचे सांगण्यात आल़े प्लॅस्टिक पिशव्यांमुळे मानवी जीवनास धोका आहेच, पण वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह करणेच अवघड झाले असल्याने पर्यायच उरला नसल्याचे विक्रेते म्हणाल़े तर ग्राहकांनी मात्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर धोकादायक असून तो थांबला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली़ मनपाच्या कारवाईमुळे शहर प्लॅस्टिकमुक्त होईल याचा मात्र नागरिकांना अजिबात विश्वास नाही. शहर प्लॅस्टिकमुक्त करायचे असेल तर प्लॅस्टिक पिशव्या शहरात दाखल होता कामा नये, शहरात येणा:या प्लॅस्टिक पिशव्या रोखल्या तरच हे शक्य असल्याचे सांगण्यात आल़े
प्लॅस्टिकवर बंदी योग्यच पण़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:56 IST