शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील खोलीचे प्लास्टर कोसळले, दोन्ही बालके वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 21:03 IST

पोलीस वसाहतीतील एका खोलीच्या छताचे प्लास्टर शनिवारी कोसळले.

संजय पाटीलअमळनेर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील एका खोलीच्या छताचे प्लास्टर खाली कोसळले. ही घटना १ रोजी दुपारी चारला घडली. यात दोन्ही जुळे बालक सुरक्षित वाचले.शहरातील ढेकू रोडवरील नवीन पोलीस वसाहतीचे उदघाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी तेथे राहायला गेले होते. १ मे रोजी दुपारी "बोरी" इमारतीत खोली नंबर तीनमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी सचिन भागवत पाटील हे बाहेर गेलेले होते. त्यांच्या पत्नीने आपली साडेतीन वर्षांची जुळी मुले पंख्याखाली गादी टाकून झोपवले होते. अचानक छताच्या प्लास्टरचा तुकडा खाली पडला आणि लहान बाळांची आई सावध झाली. तिने क्षणाचाही विलंब न लावता, तत्काळ गादी ओढून बाजूला नेली. तेवढ्यात काही क्षणातच प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळला. सुदैवाने दोन्ही बाळ वाचले.घटनेचे वृत्त पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कळवले.दरम्यान, काही दिवसातच इमारतीचे छताचे भाग कोसळणे म्हणजे बांधकामच्या गुणवत्तेबद्दल संशय निर्माण होण्यासारखे झाले आहे. या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दोषी असल्यास ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.घटना गंभीर आहे. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याना अहवाल पाठवण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही होईल.-जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, अमळनेर

 

 

टॅग्स :GovernmentसरकारAmalnerअमळनेर