जामनेर : नगरपालिकेने भुयारी गटार अथवा जलवाहिनीच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. केलेले खड्डे पालिका बुजवत नसल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन पालिकेला जागे करण्यासाठी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे.
पालिकेने केलेली रस्त्यांची व गटारीची कामे निकृष्ट दर्जाची असून याबाबत वेळोवेळी तक्रार करुनदेखील पालिका प्रशासन व नगरसेवक दुर्लक्ष करतात. गांधी चौक, अराफत चौक, भुसावळ चौफुली व मेनरोडवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात ज्या ज्या ठिकाणी नवीन रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पप्पू पाटील, ओबीसी शहराध्यक्ष प्रभू झाल्टे, सरचिटणीस संतोष झाल्टे, उपाध्यक्ष इमरान शेख, कार्याध्यक्ष अहेफाज मुल्लाजी, उपाध्यक्ष उत्तम पाटील, सागर पाटील, निखिल निकम आदींनी वृक्षारोपण केले. आता तरी पालिकेने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
===Photopath===
200621\20jal_12_20062021_12.jpg
===Caption===
जामनेरमधील रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करुन झोपमोड आंदोलन करतांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.