शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

थकबाकीदारांच्या नावाचे लावले जाहीर फलक

By admin | Updated: March 20, 2017 00:32 IST

जामनेर पालिकेची आक्रमक भूमिका : नळ कनेक्शन तोडले, जप्तीची कारवाईदेखील करणार

जामनेर :  नगरपालिकेचे विविध कर  थकविणा:यांविरोधात पालिका प्रशासनातर्फे कारवाईची आक्रमक भूमिका घेण्यात आली असून थकबाकीदारांची नावे मोठय़ा फलकावर लिहून विविध चौकात हे फलक लावण्यात आले आहेत, त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून दि. 19 मार्च रोजी रविवार असूनही सुमारे चार लाखांची वसुली झाली आहे.  शहरात घरपट्टी, नळपट्टी, व व्यापारी संकुल, तसेच एमआयडीसीतील प्लॉटधारकांकडे विविध प्रकारच्या करांची बाकी असून वसुलीसाठी न.पा.तर्फे वारंवार तगादा लावूनही थकबाकीदार दादच देत नसल्याने करवसुलीसाठी  पालिकेने वेगळा फंडा अवलंबला आहे. थकबाकीदारांच्या नावांची यादी करून त्याचे मोठमोठे  फलक संपूर्ण शहरातील चौकाचौकात लावण्यात आले आहे. पालिकेने अचानक व अनपेक्षितपणे हे पाऊल उचलल्याने थकबाकीदार फलकावर आपली नावे वाचून अवाक् झाली आहेत.  एवढय़ावरच  प्रशासन  थांबले नाही तर थकबाकीदारांना धडा शिकविण्यासाठी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा:यांनी थेट करवसुलीची धडक मोहीमही सुरू केली आहे. तसेच अनधिकृत नळ कनेक्शनला आळा घालण्यासाठी  शहरातील सार्वजनिक नळ कनेक्शन तोडून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर ज्या लोकांकडे पाणीपट्टी बाकी आहे त्यांचे कनेक्शन बंद करण्यात येत आहे. जर त्यांनी 31 मार्चर्पयत कर भरणा केला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी व शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी 100 टक्के करवसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र,  करवसुली आतार्पयत 81 टक्के झाली असून  19 टक्के मार्चअखेर्पयत वसुली होणे गरजेचे आहे. यासाठी  पालिकेचे वसुली अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनदेखील काही थकबाकीदार दादच देत नव्हते, त्यामुळे पालिकेने ही धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी  मध्यरात्री संपूर्ण शहरात थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावण्यात आले. यात भुसावळ रोड, जळगाव रोड, पाचोरा रोड, पालिका चौक, अराफत चौक, जामनेर पुरा, विविध वॉर्ड, कॉलनी भागात हे फलक  लावण्यात आले आहे. सकाळ उजाडताच नागरिकांना हे फलक दिसल्याने थकबाकीदारांची नावे वाचण्यासाठी ठिकठिकाणी लोक गर्दी  करीत होते.  दिवसभर याबाबत चर्चेला उधाण आले होते.                          (वार्ताहर)अवैध व थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडलेजामनेर नगरपालिका कर्मचा:यांनी रविवारी शहरात ठिकठिकाणी कारवाई करीत 25 अवैध नळ कनेक्शन तोडले. तर 15 थकबाकीदारांचे नळ कनेक्शनही बंद केले. दरम्यान, सार्वजनिक पाणीपुरवठा करणा:या नळ कनेक्शनवरून अनधिकृतपणे कनेक्शन घेणा:यांनाही दणका बसावा म्हणून 18 ठिकाणचे सार्वजनिक नळ कनेक्शन तोडून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या कारवाईचे सुज्ञ नागरिकांकडून स्वागत होत असून बेकायदा नळ कनेक्शनचा वापर करणा:यांचे धाबे दणाणले आहे.  31 मार्चर्पयत सर्व थकबाकीदारांनी कराची रक्कम भरावी व नगरपालिकेला सहकार्य करावे. कराची रक्कम न  भरल्यास त्यांच्यावर जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात येईल.            - शोभा बाविस्कर             न.पा. मुख्याधिकारी