ऑनलाईन लोकमतजळगाव दि. 24 - गावाला दुष्काळ मुक्त करून जलस्वयंपूर्णतेकडे न्यायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. निवड झालेल्या गावामधील कामांची निवड ही ग्रामस्थांनीच करायची आहे. या गावांमध्ये शिवार फेरीचे माध्यमातून ग्रामस्थांशी चर्चा करून गावाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.धरणगाव तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या जांभोरा, बिलखेडा व भोणे या गावांमधे रविवारी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवार फेरी व शेतकरी सभेचे आयोजन केले होते. यावेळी बिलखेडा येथे झालेल्या शिवार फेरी कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी ग्रामस्थांना जल व मृद संधारणाचे महत्व सांगितले. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.शिवार फेरीच्या वेळी सर्व यंत्रणेच्या अधिका:यांनी कामांची माहिती दिली. निवड झालेली ही सर्व गावे 2018 र्पयत जलस्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने गाव आराखडय़ाची निर्मिती करण्याच्या सूचना त्यांनी केली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रेमराज पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, मंडल कृषी अधिकारी किरण देसले, लघु सिंचन जलसंधारण (स्थानीक स्थर) चे अभियंता जोशी, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन जलसंधारणचे अभियंता मोरे, वन विभागाचे क्षेत्रपाल तडवी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मोरे उपस्थित होते.
जलयुक्त शिवारसाठी तयार होणार प्रत्येक गावाचा आराखडा : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 17:14 IST
जळगाव दि. 24 - गावाला दुष्काळ मुक्त करून जलस्वयंपूर्णतेकडे न्यायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. निवड झालेल्या गावामधील कामांची निवड ही ग्रामस्थांनीच करायची आहे. या गावांमध्ये शिवार फेरीचे माध्यमातून ग्रामस्थांशी चर्चा करून गावाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जलयुक्त शिवारसाठी तयार होणार प्रत्येक गावाचा आराखडा : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
ठळक मुद्देसहकार राज्यमंत्र्यांचा शिवार फेरीत सहभागजल व मृद संधारणाचे सांगितले महत्त्वगावे जलस्वयंपूर्ण करण्यासाठी गावनिहाय आराखडा