शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसआयटी’च्या चौकशीस विरोध करणारी याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:59 IST

तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशीस विरोध करणा-या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. आता या गुन्ह्याच्या फेरचौकशी व एसआयटी  स्थापन होणार आहे.

ठळक मुद्देजळगावातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात कामकाज  ‘त्या’ पाच गुन्ह्यांची फेरचौकशी होणार

जळगाव :  तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशीस विरोध करणा-या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. आता या गुन्ह्याच्या फेरचौकशी व एसआयटी  स्थापन होणार आहे.जळगाव पालिकेने राबविलेल्या वाघूर पाणीयोजना, विमानतळ विकास प्रकल्प, जिल्हा बँकेच्या आयबीपी योजना, पालिका आणि महावीर पतसंस्थेला दिलेले कर्ज या पाच गुन्ह्यांच्या तपासावर असमाधान व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.टी.व्ही. नलावडे व न्या.मंगेश पाटील यांच्या पीठाने या गुन्ह्यांचा फेरतपास करण्यासाठी तीन आठवड्यात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश ३ मे रोजी दिले होते.कोगटा व ओसवाल यांनी दिले होते आव्हानपाच गुन्ह्यांचा याआधी तपास झालेला असून तो योग्य झालेला आहे. एसआयटी स्थापन करुन फेरचौकशी करण्याची काहीही गरज नाही. खंडपीठाने चुकीचे आदेश दिलेले आहेत. ते रद्द करावे यासाठी राधेश्याम उर्फ श्याम मदनलाल कोगटा व ईसीपी हाऊसिंग इंडिया प्रा.लि. या कंपनीतर्फे व्यवस्थापक गिरधारीलाल ओसवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.बानुमती व न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने पहिलीच सुनावली झाली. खंडपीठाचे आदेश कायम ठेवून ओसवाल व कोगटा यांच्या याचिक न्यायालयाने फेटाळून लावल्या. अ‍ॅड.सिध्दार्थ लुथरा, अ‍ॅड.संदीप सुधाकर देशमुख व अ‍ॅड.वसीम सिध्दीकी यांच्या माध्यमातून या याचिका दाखल झाल्या होत्या.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव