शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

रॅगींग प्रकरणी वैयक्तिक चौकशी निष्फळ

By admin | Updated: September 22, 2015 23:57 IST

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगींग प्रकरणी औरंगाबादच्या समितीने विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. मात्र समितीला समाधानकारक माहिती मिळू शकली नाही.

धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या रॅगिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी औरंगाबाद येथील समिती सोमवारी रात्री उशिरा धुळ्यात दाखल झाली होती. या समितीने विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. परंतु मानसिक दबावाखाली असलेल्या विद्याथ्र्यानी समाधानकारक माहिती न दिल्याने ही समितीदेखील रिकाम्या हातीच परत गेली. तर दुसरीकडे पोलिसांनी मंगळवारी विद्याथ्र्याना बोलते करण्यासाठी बंद खोलीत जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. मात्र, पुरावे मिळत नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्याथ्र्याची काही वरिष्ठ सहका:यांनी रॅगिंग केल्याची तक्रार अज्ञात विद्याथ्र्याने ईमेलद्वारे थेट भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे केली होती. त्यानंतर विज्ञान परिषदेने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाला सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते. विद्यापीठाने दोन सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती. या आधी महाविद्यालयाने आपल्या स्तरावर चार प्राध्यापकांची समिती गठित करून चौकशी केली होती. त्यात प्रथमदर्शनी रॅगिंग झाल्याचे आढळून आले होते. म्हणून महाविद्यालयाकडून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी यांनी मंगळवारी महाविद्यालयातील 17 ते 18 विद्याथ्र्याचे बंद खोलीत वैयक्तिक जबाब नोंदवले. मात्र, प्रत्येक विद्यार्थी असा प्रकार झाल्याचे माहिती नाही, माङयासोबत काहीही झाले नाही, अशी उत्तरे देत असल्याने पोलिसांसमोर पेच कायम आहे.

महाविद्यालय प्रशासन अनभिज्ञ

सोमवारी रात्री उशिरार्पयत औरंगाबादच्या समितीने धुळ्यात येऊन विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. मात्र, अधिष्ठाता डॉ.सुधीरकुमार गुप्ता यांच्यासह प्रमुख अधिकारी याविषयी अनभिज्ञ होते. समिती आल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.

सखोल चौकशी होणार

एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रथम फेरीत धुळ्यातील महाविद्यालयात संधी मिळालेल्या काही विद्याथ्र्यानी दुस:या व तिस:या फेरीनंतर लातूर, सोलापूर, नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे धुळ्यातून बाहेर गेलेल्या विद्याथ्र्याचीही पोलीस माहिती काढत आहेत. या विद्याथ्र्याचेदेखील जबाब नोंदवले जाणार आहेत.