शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर जाण्यासाठी तीन व चारचाकी वाहन वापराची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : विमान प्रवाशांनाही मिळणार मुभा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इतर रुग्णालये, औद्योगिक वसाहतीमधील कंपनी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना कर्तव्यावर ये-जा करण्यासाठी दुचाकी, तीनचाकीसह चारचाकीने येण्या-जाण्यास मुभा देण्यात आली असून या बाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी आदेश काढले. तसेच विमानप्रवाशांनाही घरापर्यंत चारचाकी वापराची मुभा देण्यात आली आहे.जळगाव, भुसावळ व अमळनेर मध्ये ७ ते १३ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात नमूद बाबींसह बुधवार, ८ जुलै रोजी स्पष्टीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयात ये-जा करणारे आरोग्य कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेसाठी कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांंना दुचाकी, तीनचाकी व चारचाकीमध्ये कर्तव्यावर ये-जा करण्यास मुभा राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपनी, उद्योग यांचे मालक, संचालक, कंपनीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयास तांत्रिक सेवा पुरविणारे कंत्राटदार, करारबध्द संस्था, कर्मचारी यांना सेवा पुरवण्यासाठी त्यांच्या संस्थेने दिलेले ओळखपत्र पाहून वाहनांसह संबंधित कार्यालयात ये-जा करण्यास मुभा राहणार आहे.या पूर्वी लॉकडाऊनसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात चारचाकी व तीनचाकी वाहन वापरासंदर्भात स्पष्ट निर्देश नव्हते. त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी अनेक चारचाकी वाहनांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र आता या आदेशात आता सर्व स्पष्टीकरण करण्यात आले आहे.विमान प्रवाशांनाही निवासस्थानापर्यंत वाहनाची परवानगीजळगाव विमानतळावर येणाºया प्रवाशांनाही विमानतळापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत वाहनाने येण्याची मुभा राहणार आहे. त्यासाठी विमान प्रवासाचा पुरावा सोबत बाळगणे अनिवार्य राहणार असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव