शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दंगेखोरांचा कायमचा बंदोबस्त करा : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:33 IST

टिव्ही सिरीयलप्रमाणे दर ५ वर्षांनी दंगली !

लोकमत न्यूज नेटवर्करावेर : सबंध जगावर कोरोना सारख्या भयावह आजाराचे संकट घोंघावत असतांना नेहमीच्या पाच पंचवीस जणांच्या टोळक्यांनी धुडघूस घालून दंगली घडवून सामान्य जनतेला वेठीस धरण्याची बाब निंदनीय असून, आता समाजधुरीणांनीही याबाबतीत गांभीयार्ने दखल घेणे गरजेचे आहे. तथापि, रावेर शहरात दर पाच वर्षांनी एखाद्या टी व्ही सिरीयलप्रमाणे होत असलेल्या दंगली थांबवण्यासाठी दंगेखोरांचा कायमचा बंदोबस्त होईल अशी कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना दिल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आमदार चंद्रकांत पाटील व आमदार शिरीष चौधरी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. रावेर शहरात जातीय दंगलीमुळे संचारबंदी लागू असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरातील दंगलग्रस्त भागात व मयताच्या कुटूंबीयांची भेट देण्याचे टाळले.दरम्यान मयताच्या कुटूंबीयांना शासनाकडून काही मदत देता येईल का ? यासंबंधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मदत तथा पुनर्वसन मंत्री यांच्याशी बोलून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी शिवसेना तालूका संघटक अशोक शिंदे यांनी घरोघरी दुध वाटप करण्यासाठी मुभा द्यावी अशी मागणी केली असता, कोरोनाच्या संचारबंदीत व हिंसक दंगलीच्या संचारबंदीत मोठी तफावत असते. जीवनाशी निगडित रूग्णवाहीका, अग्निशमन बंब वा वैद्यकीय सेवा यांनाच माणूसकीच्या भावना गृहीत धरून सवलत देण्यात येत असते. अन्यथा संचारबंदी ही निर्मनुुष्य मानली जाते असे उगले यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, कामगार नेते दिलीप कांबळे, गोपाळ सोनवणे, मनोहर खैरनार, भागवत पाटील, डी. के. महाजन, रामदास पाटील, विकास महाजन, राष्ट्रवादी किसान सभेचे सोपान पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन महाजन, नगरसेवक आसिफ मोहंमद, गयास शेख, आदी उपस्थित होते.