शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या हॉटेलचा परवाना कायमस्वरुपी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:43 IST

हॉटेल ‘पांचाली’मधील मद्यसाठ्यात तफावत

जळगाव : लॉकडाउनमध्ये मद्याची तस्करी केल्याप्रकरणी प्रभात चौकातील हॉटेल पांचालीचा परवाना रद्द करण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. या हॉटेलचा परवाना मनपाच्या माजी महिला बाल कल्याण सभापती भारती जाधव यांच्या नावाने आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या पूर्वीच या परवानाधारकावर विभागीय गुन्हा दाखल केला आहे.शनी पेठ पोलिसांनी २६ एप्रिल रोजी कोंबडी बाजार परिसरात एका कारचा पाठलाग करुन ८८ हजार रुपये किमतीची विदेशी दारू पकडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ही दारू कोठून आली याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता प्रभात चौकातील हॉटेल पांचाली येथून हा साठा आल्याचे उघड झाले होते. त्यामुळे २८ एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती कळविली. यानुसार पथकाने हॉटेलमधील मद्यसाठ्याची तपासणी केली असता त्यात ६५० मिलीच्या बियर व ९० मिलिच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची तफावत आढळून आली होती. तसेच हॉटेलमध्ये आढळून आलेल्या मद्याच्या बाटल्यांची नोंद रजिस्टरमध्ये नव्हती. त्यामुळे हा विभागीय गुन्हा दाखल करुन हॉटेल सील करण्यात आले होते. त्या वेळी परवानाधारकांचे पती अजय जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आत्ताच काही सांगता येणार नाही असे सांगत समाधानकारक उत्तर दिले नव्हते. तसा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानुसार परवाना रद्द करण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव