शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड, आपत्ती व्यवस्थापनासाठी सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 12:46 IST

जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला

ठळक मुद्देअहवाल मागविला अहवाल शासनास सादर करण्याचे जिल्हा प्रशासनास कळविले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17-  नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास वेळीच मदत मिळावी म्हणून प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे. पूर अथवा अन्य आपत्तीमध्ये कोणी अडकल्यास त्यांना वेळीच मदत मिळण्यास अडचण होते. ऐनवेळी मदतीसाठी नौदल तसेच वायूदलाची मदत घ्यावी लागते. तसेच यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हेलिपॅड उभारावे लागते.  त्यामुळे अशा प्रसंगी वेळीच मदत मिळावी म्हणून बचाव व सुरक्षेसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड असावे, असा निर्णय घेण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड उभारल्यास आपत्तीप्रसंगी हेलिकॉप्टर उतरविणे, स्टॅण्ड बाय ठेवणे, रात्रीच्या वेळी ते सुरक्षित ठेवणे या सर्व गोष्टी शक्य होणार आहे. या सोबतच आपत्तीप्रसंगी मदत करण्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौ-यासाठी, पोलीस अथवा संरक्षक दलाच्या कोणत्याही कार्यवाहीसाठी मदत होणार आहे. 

अहवाल मागविला तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड बांधण्यासाठी सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे. यामध्ये जागा निश्चित करणे, निमशासकीय असल्यास संपादीत करणे, उड्डाण व उतरविण्यासाठी सोयीची जागा असणे, आजूबाजूला कोणतेही अडथळे नसणे, बांधकामाचे अंदाजपत्रक सादर करणे, जागेचे आरक्षण व परिरक्षणाची जबाबदारी निश्चित करणे याबाबत सूचित करण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्याचे कळविण्यात आले आहे.