शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यात घरकूलसाठी १६ वर्षांपासून ग्रामस्थांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:30 IST

शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून ग्रामस्थ थकले

चाळीसगाव : घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील शिंदी, चत्रुभूज तांडा, जुनपाणी या गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. १६ वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविले तरी त्याची दखल घेतली जात नसल्याने शिंदी येथील ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचे अस्त्र उगारत तब्बल ७५हून अधिक ग्रामस्थ चाळीसगाव येथे उपोषणास बसले. मात्र दुपारी पं.स. सभापतींच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. असे असले तरी आश्वासनाची पूर्तता कधी होणार व खरा लाभ कधी मिळेल, याचीच प्रतीक्षा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.शिंदी गावासह चत्रुभूज तांडा, जुनपाणी येथील ग्रामस्थ घरकूल योजनेचा लाभ मिळावा यासाठी भटकंती करीत आहेत. २००२ ते २००७ दारीद्र रेषेखालील सर्वेमध्ये समाविष्ट असणाऱ्या बेघर ग्रामस्थांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. याबाबत ७ रोजी लोकशाही दिनी जिल्ह्याधिकाºयांकडेदेखील दाद मागण्यात आली. मात्र दखल घेतली जात नसल्याने ७५ हून अधिक नागरिक पंचायत समितीच्या प्रांगणात उपोषणास बसले. याबाबत गटविकास अधिकाºयांना निवेदन देण्याबरोबरच लोकशाही दिनीही ग्रामस्थांनी दाद मागितली होती. मात्र घरकुलसाठीच्या मोकळ्या जागेचे सर्वेचे कामही झाले नाही. २००२ पासून लाभ मिळाला नसल्याचे निवेदनात नमूद करीत ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने काम रखडले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.या गावातील ग्रामस्थांना घरकुलाचा लाभ का मिळत नाही, या बाबत गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की येथील ग्रामसेवक पी.आर.तिरमली यांना कामात कसूर केल्याने त्यांना निलंबित केले आहे. असे असले तरी ग्रामस्थांचे कामे रखडले असून पर्यायी व्यवस्था का केली जात नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.दुपारी चार वाजता पं.स.सभापती स्मितल बोरसे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पुन्हा राबविण्यासाठी ठराव करण्यात येऊन तो शासनाला पाठविण्यात येईल, असे अश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी उपोषण सोडले. यावेळी पं.स. राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, पं.स.सदस्या लता दौंड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव