शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या चिंग्याला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:32 IST

जळगाव : पहारा ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयाची कॉलर पकडून धमकी दिल्याप्रकरणी चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे (३४) यास शुक्रवारी ...

जळगाव : पहारा ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयाची कॉलर पकडून धमकी दिल्याप्रकरणी चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे (३४) यास शुक्रवारी दोषी धरून एक आणि तीन वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़जी़ ठुबे यांनी हा निकाल दिला.४ जुलै २०१४ रोजी पोलीस हवालदार पुरूषोत्तम सुपडू लोहार हे शहर पोलीस ठाण्यात पहारा ड्युटीवर होते़ त्यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ७ संशयित होते. रात्री १०़१० वाजेच्या सुमारास चिंग्या हा तेथे आला व त्याने आपणास कोठडीतील सुरेश ठाकरे व अन्य दोन जणांना भेटायचे असल्याचे सांगितले. त्यास लोहार यांनी नकार दिला. त्यावर चिंग्याने त्यांची कॉलर पकडून धमकी देत शिवीगाळ केली़सरकारपक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले़ भादंवि कलम ३५३ प्रमाणे तीन वर्षे तसेच भादंवि कलम ५०६ प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व १ हजार रूपयांचा दंड ठोठावला़ सरकारपक्षातर्फे अ‍ॅड़ पंढरीनाथ चौधरी व सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले़चिंग्या आहे आधीच जन्मठेपेच्या शिक्षेतकाही महिन्यांपूर्वीच चिंग्या याला खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ शुक्रवारी सुध्दा पोलिसाच्या कॉलर पकडण्याच्या प्रकरणात न्यायालयीन कामासाठी त्याला नाशिकहून आणण्यात आले होते़

टॅग्स :Jalgaonजळगाव