शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पादचारी तरूणाला महामार्गावर कंटेनरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 12:03 IST

अजिंंठा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन

ठळक मुद्देनातेवाईकांचा रूग्णालयात आक्रोश

जळगाव : कामाला जाणाऱ्या पादचारी तरूणाला कंटेनरने चिरडल्याची दुर्देवी घटना राष्टÑीय महामार्गावर हॉटेल मानसनजीक शनिवारी सकाळी ९़३० वाजता घडली़ गुफरान खान अजमल खान (वय-२३, रा़ सालार नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे़ या घटनेनंतर संतप्त जमावाने चालकाला बदडून काढले. त्यानंतर चालकासह क्लिनरला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर संतप्त जमावाने अजिंंठा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीवेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़गुफरान खान हा सालार नगरात आई-वडील आणि दोन लहान भावांसोबत वास्तव्यास होता़ दरम्यान, त्याने एमबीएचे शिक्षण राससोनी महाविद्यालयातून नुकतेच पूर्ण केले होते़ त्यानंतर यानंतर गेल्या काही वर्षापासून अयोध्यानगरातील एका दुचाकी शोरूमवर तो सेल्स एक्झीकेटीव्ह म्हणून कामाला होता़ सकाळी साडे नऊ वाजता तो नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी शनिवारी घरातून निघाला़ सालारनगर ते शोरुम अगदी दहा मिनिटाचा रस्ता आहे. त्यामुळे दररोज तो पायी जायचा़ शनिवारी देखील सकाळी घरातून नऊ वाजता गुफरान हा घरातून निघाला़ मात्र, मानस हॉटेलसमोरून पायी रस्ता ओलांडत असताना त्याला ओडीशा येथून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटनेरने (क्र.ओ.डी. ०२़एल़४८२६) जोरदार धडक दिली. यात तो खाली कोसळला. पोटावरून कंटनेर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़नातेवाईकांचा रूग्णालयात आक्रोशघटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. खासगी रूग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह रूग्यालयात आणण्यात आला होता. दुपारी सव्वा अकरा वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. गुफरान खान हा मनमिळावू स्वभावाचा व कुणाच्याही मदतीला धावून जात असल्याने रुग्णालयात मोठी गर्दीही झाली होती. गुफारान खान याचे वडील अजमलखान हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकआहेत. त्याच्या पश्चात दोन भाऊ उवेश खान, सौद खान तसेच आई असा परिवार आहे.अजिंठा चौफुलीवर रास्ता रोकोगुफरान खान यांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना दिल्यावर संतप्त जमावाने घटनास्थळी रास्तारोको आंदोलन सुरू केले. अजिंठा चौफुलीवर अचानक येत नागरिकांनी रास्ता रोको केल्याने रस्ताच्या दुर्तफा वाहतूक ठप्प झाली होती. शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. संतप्त जमावाने पोलिसांनी ठोस भुमिका न घेतल्यास दिवसभर आंदोलन करण्याची भुमिका घेतली होती. महामार्गावर गतिरोधक बनविण्यात यावे तसेच महामार्गाजवळ शाळा असल्यामुळे पुढे शाळा आहे, असे फलक देखील लावले नाही, त्यामुळे हे फलक लावावे व त्वरीत महामार्गाच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी संतप्त जमावाकडून करण्यात आली़ यावेळी एमआयएम संघटेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी झाले होते़ जिल्हाधिकारी व नही चे अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्र संपत्त जमावाने घेतला होता़संतप्त जमावाने चालकास बदडले... अजिंठा चौफुली ओलाडल्यानंतर कंटेनर चालक छोटू मोहन बागवान (२५, रा़ मध्यप्रदेश) याने नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून पायी येणाºया गुफरानला चिरडल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली़ त्यानंतर संतप्त जमावाने चालक छोटू याला कंटेनरमधून बाहेर काढून बदडले़ माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ काही नागरिकांनी गुफरान यास जिल्हा रूग्णालयात हलविले़ मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाºयांनी त्यास मृत घोषित केले़ जमावाने चालक छोटू व क्लिनर गलेसिंग पंदरे (वय-२८, रा़ मध्यप्रदेश) या दोघांना पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले़

टॅग्स :Accidentअपघात