शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा
2
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
3
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
4
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथ्या नंबरवर; भारतासाठी आनंदाची बातमी
5
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार
6
“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; उच्चांकी स्तरावरुन मोठ्या प्रमाणात घसरले दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत
8
धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
9
सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
10
रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
11
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
12
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
14
Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य
15
Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा
16
"हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, त्याने..."; कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण
17
गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द
18
बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी
19
मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला मोठा विक्रम
20
संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली

शांतता समितीने सहकार्यासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 21:06 IST

शांतता समितीच्या सभेत बोलणारे सदस्य प्रत्यक्ष उत्सवाच्यावेळी सहभागी होत नाही. त्यांनी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी येथे केले.

ठळक मुद्देचाळीसगावात शांतता समितीच्या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांचे आवाहनशांतता समितीच्या सभेत बोलणाऱ्या सदस्यांनी प्रत्यक्ष उत्सवाच्यावेळी सहभागी व्हावेबामोशीबाबा ऊरुसाठी मोबाइल शौचालयाची मागणी

चाळीसगाव, जि.जळगाव : शांतता समितीच्या सभेत बोलणारे सदस्य प्रत्यक्ष उत्सवाच्यावेळी सहभागी होत नाही. त्यांनी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी येथे केले.शिवजयंती, बामोशीबाबा ऊरुस व होळी सणांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बामोशीबाबा दर्गाह परिसरात आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासह मोबाईल टॉयलेट उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. आगामी काळात होळीसह हिंदू- मुस्लीम बांधवांचा श्रद्धास्थान असलेले पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांचा उर्स व त्याच दिवशी शिव जयंती असा दुध शर्करा योग आला आहे.शिवजयंती सकाळी साजरी करुन सायंकाळी बाबांची तलवार निघेल. मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे. दर्गा ट्रस्टने भाविकांना सुविधा पुरवाव्यात, स्वंसेवकांची नेमणुक करावी, अफवा पसरवू नये, भावना दुखावतील अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये. तसेच सण उत्सव सर्वांनी मिळून साजरे करावे, असेही बच्छाव म्हणाले.यावेळी डीवायएसपी नजीर शेख यांनी शिवजयंती सकाळी साजरी करुन सायंकाळी तलवार मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे सांगून पोलीस प्रशासन या काळात दक्ष असेल असे आश्वासन दिले.व्यासपीठावर प्रदीप देशमुख, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख श्यामलाल कुमावत, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, आनंदा कोळी, रामचंद्र जाधव, श्याम देशमुख, आनंद खरात, किसनराव जोर्वेकर, दिलीप घोरपडे, अल्लाउद्दीन शेख, हाजी गफूर, दिलावर मेंबर, सपोनि आशिष रोही, सुरेश शिरसाठ, पोउनि मछिंद्र रणमाळे, राजेश घोळवे, युवराज रबडे आदींसह शांतता समिती सदस्य उपस्थित होते. यशस्वितेसाठी गोपनीय शाखेचे गणेश पाटील, पंढरीनाथ पवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेChalisgaonचाळीसगाव