शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
5
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
6
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
7
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
8
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
9
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
10
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
11
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
12
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
13
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
14
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
15
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
16
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
17
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
18
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
19
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
20
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 

स्मारकांच्या स्वच्छतेने केली जातेय देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:49 PM

स्वराज्य निर्माण सेनेचा उपक्रम

जळगाव : ज्या महापुरूषांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, अशा महापुरूषांच्या स्मारकांच्या साफसफाईकडे सर्वाचेंच दुर्लक्ष होत असते़ मात्र, शहरातील स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्र या संघटनेकडून अनेक वर्षापासून ह्यस्मारक स्वच्छताह्ण हा स्तुत्य उपक्रम राबवून शहरामधील महापुरूषांच्या स्मारकांची साफसफाई करून आपली देशभक्ती जोपासत आहेत़स्वराज्य निर्माण सेनेची सन २०१२ मध्ये संस्थापक अध्यक्ष महेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना झाली़ बघता-बघता ही संघटना तब्बल ९२ गावांमध्ये पोहोचली़ अन् तब्बल पाच हजाराच्यावर स्वराज्य सैनिक या संघटनेशी जुळले़ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती तरूण पिढीला व्हावी आणि महाराजांचे विचार तरूणांमध्ये रूजावे हा उद्दीष्ट ठेवून संघटनेकडून सर्वात आधी ह्यशिव वंदनाह्ण हा उपक्रम राबविण्यात आला़ यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली आरती शिवतीर्थ मैदानावर म्हटली जाते़ यात आरतीतून महाराजांच्या कार्याची माहिती मिळतेच, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावकरांच्या आठवणींना सुध्दा उजाळा दिला जातो़ शिवराय आणि आजची तरूण पिढी या विषयावर व्याख्यान दिले जाते.जळगाव, धुळे तसेच नंदुरबार व बुलढाणा जिल्ह्यात सुध्दा स्वराज्य सैनिक आहेत़ या सैनिकांकडून देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महापुरूषांच्या स्मारकांची साफसफाई करून चकचकीत केले जाते़ तर दर आठवड्याला मंदिरांची कळसापासून तर पायथ्यापर्यंत स्वराज्य सैनिकांकडून सफाई करण्यात येते़ दिवाळीत पहिला दिवा हा स्वराज्य सैनिकांकडून घरात नव्हे तर मंदिर, शिवतीर्थ मैदान आणि स्मारकांवर लावून दिवाळी साजरी करून देशभक्ती जोपासली जाते़ंशिवगंध जपतोय पारंपारिक संस्कृतीस्वराज्य निर्माण सेनेचे शिवगंध हे पारंपारिक संस्कृती जपणारे ढोल पथक तयार करण्यात आले आहे़ या पथकाचे महाराष्ट्रभर नाव पसरले आहे़ एवढेच नव्हे गणेशोत्सव व दुर्गोत्सव पथकाला मिळणाऱ्या पैशातूनच स्वराज्य निर्माण सेनेकडून सामाजिक उपक्रम राबविले जातात़ भारतीय संस्कृती सोबतच महापुरूषांची माहिती जास्तीत-जास्ती तरूणांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेवून संघटना काम करित आहे़

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनJalgaonजळगाव