शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पितृपक्षाचा अंगारकी यात्रेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 21:46 IST

पितृपक्षात अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने श्री क्षेत्र पद्मालय येथे मंगळवारी भाविकांच्या उपस्थितीत घट दिसून आली.

ठळक मुद्देअवघ्या ३५ हजार भाविकांची हजेरीपद्मालयच्या तलावात फुललेली कमळाची फुले जणूकाही भाविकांचे स्वागत करीत होती

एरंडोल, जि.जळगाव : या वेळी पितृपक्षात अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने श्री क्षेत्र पद्मालय येथे मंगळवारी भाविकांच्या उपस्थितीत घट दिसून आली. या अंगारिकेला ३० ते ३५ हजार भाविकांनी हजेरी लावली. याप्रसंगी जिल्ह्यासह महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी आले होते. तसेच श्री क्षेत्र पद्मालयच्या तलावात फुललेली कमळाची फुले जणूकाही भाविकांचे स्वागत करीत होती.ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ३.३० वाजता जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी मंदिराचे पुजारी केशव पुराणिक यांच्या मंत्रोच्चाराने पूजा करण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, मंडळ अधिकारी जाधव, महसूल कर्मचारी तथा देवस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. यावेळी मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच श्री क्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीच्या योग असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनबारी, स्वयंसेवक, रुग्णवाहिका, पोलीस बंदोबस्त, जनरेटर व महामंडळातर्फे एस.टी. बसेसची व्यवस्था व डॉ.पी.जी.पिंगळे यांच्यातर्फे सालाबादाप्रमाणे या वेळेसही मोफत वैद्यकीय सेवा भाविकांसाठी पुरविण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमErandolएरंडोल